+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द
schedule18 Aug 22 person by visibility 268 categoryलाइफस्टाइल


आवाज इंडिया प्रतिनिधी 

पिंपरी चिंचवड : दारिद्र्याच्या छायेखाली पालात राहणाऱ्या चिमुकल्यांचं देशप्रेम दर्शविणारा "निशान" हा लघुपट भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. रेडबड मोशन पिक्चर्स यांनी पुन्हा एकदा सामाजिक आशय असलेला लघुपट बनवला आहे. या लघुपटाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

परिस्थितीने निर्बंध घातले तरी मनातली उर्मी एखादी गोष्ट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही, मग वाट्टेल ते झाले तरी परिणामाची तमा न बाळगता ते पाऊल उचलण्याचे धाडस केल्याशिवाय मन समाधान मानत नाही. याचा तंतोतंत सारांश 'निशान' या लघुपटातून मांडण्याचा अतिशय प्रमाणिक प्रयत्न दिग्दर्शक व चार्टर्ड अकाऊंटंन्ट अरविंद भोसले यांनी केला आहे. या पूर्वी ही भोसले यांनी महिला सशस्तीकरणाचा सामाजिक संदेश देणारा "भावना" लघुपट बनवला आहे. या लघुपटाला सलग ३ आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. "निशान" हा डोळ्यांत अंजन घालणारा लघुपट अवघ्या सात दिवसात पूर्ण करण्यात आला आहे. याचे संपादन पिंपरीतील एपिएच स्टुडिओच्या संचालिका अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे. या लघुपटातील सर्व कलाकार पिंपरीतील नेहरूनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन परिसरातील आहेत. विशेष बाब म्हणजे यातील सर्व कलाकार प्रथमच अभिनय करत आहेत.

दोन वेळच्या खान्याची भ्रांत असताना या शहरातून त्या शहरात स्थलांतर होऊन तात्पुरती पालं टाकून त्यात गुजराण करणाऱ्या नागरिकांच्या वस्तीवर देशभक्ती कशी असते. शिक्षण घेण्याची अतुट इच्छाशक्ती असताना आर्थिक दारिद्र्यामुळे झोपडपट्टीतील मुले या मुख्य प्रवाहातून कशी दूरवर फेकली जातात. शाळेच्या अवतीभवती भटकत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि 'हर घर तिरंगा' या मोहिमेची माहिती कानावर पडते. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी झपाटून कामाला लागलेला देश आणि परिसर पाहून आपण सुध्दा या मोहिमेचा भाग बनले पाहिजे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची हिम्मत अंगी बाळगून चक्क चोरी करण्यापासून ते देशभक्ती व्यक्त होईपर्यंत एक अनभिज्ञ मुलगा तावून सुलाखून निघालेला 'निशान' या लघुपटात दाखवण्यात आला आहे.

या लघुपटाचे निर्माते मनोज गायकवाड, राजेंद्र कालिया हे आहेत.बाल कलाकाराची मुख्य भूमिका गौरव कदम या चिमुकल्याने केली आहे. तर सह बाल कलाकारची भूमिका वेदांत डोंगरे, कुमार आवचर, प्रज्वल तुमकुर, प्रदीप तुमकुर यांनी काम केले आहे. अंकुर शहा, बसवराज तुमकुर यांनी मोठ्या कलाकारांची भूमिका साकारली आहे. छायाचित्रण केले आहे प्रशांत कोचरेकर यांनी तर संगीतबद्ध केले आहे प्रथमेश कानडे यांनी. या लघुपटासाठी शिवा हरळ, सुनील वाघमारे, अर्चना गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.