असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
टकाटक या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर यश मिळवलं.या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होत.आता याच चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.हसत खेळत संवेदनशील विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या टकाटक चा पुढील भाग ' टकाटक 2 नावाने 18 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची कथा गण्या , शऱ्या,आणि चंदू या तीन मित्रांच्या भोवती फिरते.त्यांच्यात चालणारी दंगा ,मस्ती ,चेष्टा, मस्करी, विनोद करता करता एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न' टकाटक 2 ' च्या माध्यमातून करण्यात आला आहे.चित्रपटाचे पटकथालेखन आणि संवाद लेखन या चित्रपटाची जमेची बाजू आहे.प्रथमेश परब ,अजिंक्य राऊत ,प्रणाली भालेराव,अक्षय केळकर ,भूमिका कदम ,कोमल बोडखे ,सुशांत दिवेकर ,स्वप्नील राजशेखर,किरण माने,पंकज विष्णू,किरण बेरड, आरजे महेश काळे,स्मिता डोंगरे या कलाकारांचा उत्तम अभिनय हे टकाटक 2 चे मुख्य वैशिष्ट्य आहे.प्रत्येकाने आपापल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.चित्रपटातील गीत - संगीतही रसिकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे'.घे टकाटक दे टकाटक ' आणि 'लगीन घाई ' ही गाणी सध्या खूप गाजत आहेत.
टकाटक 2 चे दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केले आहे.कथा - पटकथाही त्यांनीच लिहिली आहे.संवाद लेखन किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी केले आहे.पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं आहे.छायांकन हजरत शेख वली यांनी केलं असून निलेश गुंडाले या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
टकाटक 2 ची निर्मिती रिलायन्स एन्टरटेन्मेंट स्टुडिओने पर्पल बुल एन्टरटेन्मेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट,रिलायन्स एन्टरटेन्मेंट स्टुडिओ,नरेश चौधरी ,आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट केवळ तरुणाईसाठी नसून ,प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी आहे .यातून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.