+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule26 Sep 22 person by visibility 172 categoryशैक्षणिकशैक्षणिक

मुंबई - प्रतिनिधी (हणमंत दडस)

 बेयर इंडिया फौंडेशनच्या CSR उपक्रमाअंतर्गत ज्ञानकमल शिक्षण संस्थेस पाच संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले. या संगणक संचाचा उपयोग ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण मिळावे यासाठी करण्यात येईल.

 यापूर्वीही ज्ञानकमल शिक्षण संस्थेमार्फत कर्जत व अंबरनाथ तालुक्यातील जि.प. व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना डिजीटल शिक्षण मिळावे या हेतूने मोफत संगणक संचाचे वाटप करण्यात आले होते. हा संस्थेचा महत्त्वपूर्ण उपक्रम लक्षात घेवुन बेयर इंडिया कंपनीचे ग्रुप IT प्रमुख जितेंद्र बकलीवाल यांच्या सहकार्यातून बेयर इंडिया फौंडेशनयांच्या सौजन्याने पाच संगणक संच ज्ञानकलम शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रो. मनीषा बाईकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
               
 याप्रसंगी जितेंद्र बकलीवल सर, संजीव जैन (CIO, इंटेग्रेऑन), मनीषा बाईकर (चेरमान, ज्ञानकमल शिक्षण संस्था) इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी बेयर इंडियाच्या CSR टीमचे खुप खुप आभार व्यक्त करण्यात आले.