कोल्हापूर (प्रतिनिधी) :- कोल्हापूर महानगरपालिका आणि शहराच्या समस्या या बाबत कित्येक आंदोलन झाली. शहरवासीयांना या समस्या कायमस्वरूपी सतावत असतात. मात्र यावर उपाय कोणी काढत नाही. याला अपवाद म्हणजे दत्त गल्ली मधील विकास कामांचे उद्घाटन होय.
सामाजिक कर्यकर्ते अजित पवार यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दत्त गल्ली येथील गटर्स ते कसबा गेट पासून जैन मंदिर पर्यंत रस्ता अशा विकास कामाचे जेष्ठ नागरिक व अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या बहुमोल सहकार्यची चर्चा शहरभर सुरू आहे. जाधव यांच्या फंडातून संयुक्त आझाद गल्ली आराम कॉर्नर राजाराम रोड प्रभाग क्रमांक 32 चे उमेदवार शिवांजनी फाउंडेशनच्या सदस्या सौ. सरिता अजित पवार याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.