Awaj India
Register
Breaking : bolt
अंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथाभारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ सप्टेंबरला जाहीर स*आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीप्रकरणी आरती आंबी पुणे कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार...* *डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला* *‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे**बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड* *आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन*जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

जाहिरात

 

सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र*

schedule12 Aug 26 person by visibility 195 categoryराजकीय

*
      
*अवसायनातील सर्वच दूध संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा*
      
*सरकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या अदृश्य शक्तींना उच्च न्यायालयाची मोठी चपराक*
        
कोल्हापूर, दि. १२:
गोकुळ दूध संघाच्या एकूण ६४४ सभासद संस्था प्रशासनाने अवसायनात काढल्या होत्या. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात सहकारी दूध संस्था मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गेल्या होत्या. याची सुनावणी काल व निकाल आज होऊन या संस्थांना उच्च न्यायालयाने पात्र ठरवले. त्यामुळे; अवसायनात काढलेल्या सर्वच संस्थांच्या पात्रतेचा म्हणजेच पर्यायाने मतदानाच्या हक्काचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  सरकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाठीमागून लढणाऱ्या अदृश्य शक्तींना उच्च न्यायालयाने या निकालाद्वारे मोठी व जोरदार चपराक हाणली आहे.
​            
सहाय्यक निबंधक - दुग्ध श्री. कृष्णा ठाकरे यांनी दिलेले अवसायनातील संस्थांबाबतचे आदेश हे नैसर्गिक न्यायतत्त्वास धरून नसल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती श्री. शैलेश ब्रह्मे यांनी हा निकाल दिला.
​           
या दूध संस्थांच्या भवतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्रीनिवास पटवर्धन, ॲड. भूषण मंडलिक, ॲड. प्रबोध पाटील, ॲड. धैर्यशील पवार आणि सरकारच्या वतीने ॲड. सतीश तळेकर यांनी काम पाहिले.
​             
आज बुधवार दि. १२  ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमाराला निकाल जाहीर होताच या संस्था प्रतिनिधींनी सहनिबंधक कार्यालय (दुग्ध) समोर गुलालाची उधळण व फटाके वाजवून आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes