+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule15 Dec 22 person by visibility 96 categoryराजकीय

आवाज इंडिया प्रतिनिधी

म्हाळुंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक 2022 
सर्व प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांच्या मध्ये चुरशीचा सामना होत आहे ,यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला जोरात उधाण आले आहे प्रचारामध्ये प्रत्येक जण दरवेळी प्रमाणे वेगवेगळे फंडे वापरत आहेत यामध्ये शपथा घेणे भंडारा उचलणे शब्द देणे अनेक प्रकार प्रचाराच्या धुमाकळीत अत्यंत सराईतपणे सुरू आहेत अशाच वेळी एक वेगळी वाट चोकाळून नियोजनबद्धपणे परंपरागत जुन्या अनिष्ट रूढी ना फाटा देत श्रीमतीअर्चना संदीप कांबळे श्रीमती दीपिका नितीन कांबळे यांच्यासह इतर तीन समाजातील विधवा महिला यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ करत ब्राईट आर्मीचे जिल्हाध्यक्ष समीर यशवंत घारे या तरुणाने एक वेगळा नवा आदर्श समाजापुढे मांडला आहे समीर घारे हे प्रस्थापित आणि परंपरागत पक्ष पार्टी सोबत न जाता वैयक्तिक स्तरावर माळुंगे येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये ट्रॅक्टर हे चिन्ह घेऊन अपक्ष उभे आहेत बहुतांशी लोक धार्मिक कार्य किंवा घरातले गृहप्रवेश लग्नसोहळे इत्यादी विविध सोहळे विधवांच्या हस्ते घेऊन घेऊन वैयक्तिक स्तरावरील कार्यक्रम करतात अशा कार्यक्रमाला समाजाची सहानुभूती मिळते पण सर्व समाजाला ते मान्य असते असे नाही अशावेळी निर्भीडपणे योग्य सामाजिक कामाची उर्मी आणि विकासाचे ध्येय मनामध्ये ठेवून कोणत्याही समाज निंदेची पर्वा न करता व त्याचा मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो, याचा विचार न करता समीर घारे यांनी प्रभाग क्रमांक एक मधून ट्रॅक्टर या चिन्ह घेऊन अशा सर्व महिलांच्या सहभागामध्ये जोरदारपणे प्रचाराचा शुभारंभ यामुळे अशा मानसिकतेच्या या उमद्या तरुणाचं सर्वत्र कौतुक होत आहे लवकर मला सर्वत्र दाद मिळत आहे असे उपक्रम समाजात झाल्यास आपोआपच अनिष्ट रूढी परंपरांना आळा बसेल असं या विधवा महिलांनी आपले मत मांडले.