+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द
schedule24 Aug 22 person by visibility 228 categoryआरोग्य

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी

रूकडी : रुकडी, तालुका हातकणंगले हे सुमारे 30 ते 35 हजार लोकसंख्येचे गाव आहे. परिसरातील सर्वात मोठे गाव म्हणून गावाला ओळखले जाते .येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज सुमारे 80 ते 100 रुग्णांवर उपचार होतात .पण सध्या रूकडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारीच नसल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे.

येथील आरोग्य अधिकारी मुजावर काही दिवसांपासून आरोग्याच्या कारणास्तव रजेवर आहेत. मात्र त्यांच्या जागेवर आरोग्य विभागाने अजूनही दुसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली नाही. अधिकाऱ्याविना आरोग्य केंद्र बंद असल्याने गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे .यामुळे गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा भरमसाठ आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.