+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी
schedule21 Jun 22 person by visibility 572 categoryआरोग्य

गांधीनगर आवाज इंडिया प्रतिनिधी कपिल घाटगे


वळीवडे ता. करवीर येथे आज 21 जून रोजी वळीवडे गावामध्ये अष्टांग योग संस्थेच्या वतीने, आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून कुमार विद्या मंदिर,कन्या विद्या मंदिर, डॉ.कु.मालती मोहनलाल दोशी हायस्कूल, श्री. राजर्षी छ. शाहू बालसंस्कार केंद्र,वळीवडे येथील शाळांमध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. गेली आठ वर्षे योग प्रशिक्षक कानिफनाथ पंढरे सातत्याने निस्वार्थीपणे योगाचे धडे देत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करत आहेत.
         याप्रसंगी योगप्रशिक्षक कानिफनाथ यांनी, अष्टांगयोग- जीवन जगण्याची कला आहे. 'योग'म्हणजे केवळ व्यायाम, योगासने, प्राणायाम या शारीरिक क्रिया असाच बहुधा लोकांनी अर्थ घेतला आहे.परंतु, आपण जर योगाविषयी सखोल माहिती घेतली, योगाची खोली जाणून घेतली आणि त्याचा खरा अर्थ काढला, तर योग ही आपल्या जीवनातील सर्वाधिक मोठी प्राप्ती आहे, हे आपल्या लक्षात येईल. योगामुळे आपण केवळ शारीरिक, मानसिक किंवा भौतिक श्रेष्ठत्वच प्राप्त करत नाही; तर आपला जीवनमार्ग सुखी आणि समृद्ध करून संपूर्ण कुटुंबाकडे संपूर्ण लक्ष पुरवून आपण अध्यात्मिकतेच्या चरम शिखरापर्यंत पोहचू शकतो.असा संदेश दिला. यावेळी त्यांनी योगाचे प्रात्यक्षिके करून दाखवली. योगा विषयी अधिकची माहिती दिली. 
      यानिमित्ताने पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप सांबरे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद शिरोटे, शंकर शिपेकर हे उपस्थित होते तसेच कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक दिलीप भोई, कन्या विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका गीता कोरवी, डॉ. कु. मालती मोहनलाल दोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोहर पोवार, श्री.राजर्षी छ. शाहू बालसंस्कार केंद्र येथे योग शिक्षिका प्रतिमा पंढरे यांनी योगा प्रोटॉकलचा अभ्यास घेतला, मुख्याध्यापिका सुचेता चौगुले, सर्व शाळांचे शिक्षक, स्टाफ, विद्यार्थी- विद्यार्थिनी , ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
    आजचा हा योग दिन उत्साहपूर्ण, यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अष्टांग योग संस्थेच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब दिगंबरे,जितेंद्र कुसाळे, शशी खांडेकर, राजू रेपे, अभिजित खांडेकर,वैजनाथ गुरव यांनी आयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली.