+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule22 Jun 22 person by visibility 210 categoryआरोग्य
आज दिनांक 21 जून 2022 रोजी 8 व्या आंतरराष्ट्रीय (जागतिक) योग दिनाच्या निमित्ताने ' योग फॉर हयुमुनिटी '(मानवतेसाठी योग) या थीमवर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता Art Of living ( व्यक्ति विकास केंद्र , विभाग -सांगली ) या संस्थेच्या वतीने दि.14/06/2022 ते 21/06/2022 पर्यंत साप्ताहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
सदर योग शिबिराच्या समारोह , आंतरराष्ट्रीय योगदिनी बंदी व कर्मचारी यांच्या कडून विविध प्राणायाम, योगासनं , योगसाधना, योगाभ्यास करून घेऊन, योगाचे महत्व सांगण्यात आले.
कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी यावेळी असे प्रतिपादन केले की, " सध्या जागतिक स्तरावर कोविड मुळे फक्त आपल्या शरीरावरच नाहीतर आपल्या मानसिक आरोग्यवरही खूप जास्त परिणाम झालाय. योग केल्याने फक्त आपले शरीरच निरोगी राहत नाही तर योग मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे." त्यासाठी करा योग,सदैव रहा निरोग..असेही ते पुढे म्हणाले.
सदर योगासन शिबिरात 57 पुरूष व 19 महिला बंदीनी तसेच 23 अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.संस्थेचे संगीता पाटील,(प्रशिक्षण )दिनेश जाखोठिय्या (स्वयंसेवक) उपस्थित होते.