+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या adjustविकसित भारताच्या संकल्पासाठी गगनबावड्याची जनता मंडलिकांच्या पाठीशी
schedule30 Jun 22 person by visibility 268 categoryआरोग्य

गांधीनगर आवाज इंडिया प्रतिनिधी
कपिल घाटगे

वळीवडे ता.करवीर भारत सरकारच्या आयुष्यमान डिजिटल मिशन योजनेद्वारे,देशातील सर्व नागरिकांची आरोग्य विषयक माहिती संकलित करून ती डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी हेल्थ आय डी कार्ड नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यासाठी नागरिकांनी हेल्थ आयडी कार्ड नोंदणी करून हेल्थ आयडी कार्ड बनवून घेण्याविषयी आयुष्यमान डिजिटल मिशन द्वारे,आवाहन करण्यात येत आहे. काल दि.२९जून रोजी भिमनगर कॉलनी, वळीवडे येथे ही योजना राबविण्यात आली.
     हेल्थ आय डी कार्ड NCD पोर्टलवर नोंदणी चे फायदे काय आहेत. याची माहिती देत असताना आरोग्य सेवक राकेश घोडके म्हणाले, प्रत्येकाच्या वैयक्तिक आरोग्याची सर्व माहिती याद्वारे आयुष्यमान भारत योजनेकडे संकलित राहील. यातील प्रत्येकाची माहिती गोपनीय ठेवली जाईल., यामुळे वेळोवेळी येणाऱ्या शासकीय आरोग्य योजनेचा थेट फायदा सदर रुग्णांना होईल, उपकरणांद्वारे होणाऱ्या सोनोग्राफी एम.आर.आय.,सी टी स्कॅन सारख्या तपासणी शासकीय योजनेतून होण्यासाठी हेल्थ आय डी कार्ड असणे व नोंदणी करणे गरजेचे आहे. अगोदर झालेले उपचार, आरोग्याचे रिपोर्ट पोर्टल वर जतन केल्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी पूर्वीचे रिपोर्ट वारंवार सादर करावे लागणार नाहीत.,हेल्थ आय डी नोंदणी केलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान योजनेअंतर्गत मोठ्या आजारांसाठी शासनाकडून मोफत उपचारांची सोय,आपला मेडिक्लेम असेल तर त्यासाठीची पडताळणीही हेल्थ आयडी द्वारे सोपी व जलद प्रक्रिया होईल. अशा अनेक आरोग्य विषयक लाभांची माहिती यावेळी देण्यात आली. जर आपण अगोदरच हेल्थ आय डी बनवली असेल तरीही आय डी नंबर शासनाच्या NCD पोर्टलशी जोडणे अत्यावश्यक आहे.  
    या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ लाभ व्हावा. ही योजना यशस्वी व्हावी. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गडमुडशिंगी, उपकेंद्र चिंचवाड ,वळीवडे येथील डॉक्टर, आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविका प्रयत्न करत आहेत.                   
       त्याबरोबरच डेंगू, मलेरिया यासारखे कीटकजन्य आजार कसे होतात. त्या संदर्भात घ्यावयाची काळजी, त्यावरील उपाय याबद्दल माहिती देऊन येथील परिसरामध्ये डासअळीची तपासणी देखील करण्यात आली.
    आरोग्य सेवक राजेश घोडके यांच्यासोबत दिपाली सलगर,आशा स्वयंसेविका प्रभावती नलवडे, पूजा भोसले,धनश्री पोवार,अंगणवाडी सेविका जयश्री देबाजे,मदतनीस कल्पना भोसले यांचे सहकार्य लाभले. परिसरातील नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.