+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule23 May 22 person by visibility 167 categoryआरोग्य
नालेसफाईतून 1458 टन गाळ उठाव
कोल्हापूर ता.20 : राजारामपुरी येथील चॅनल सफाई कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सकाळी पाहणी केली. राजारामपुरी जनता बझार चौक येथील चॅनलची सफाई करण्यात येत आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा, प्लॅस्टीक, थर्मोकॉल, प्लॅस्टीक बॅनर्स, बाटल्या व इतर कचरा या नाल्यातून काढण्यात आला. यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त विनायक औंधकर, उप-शहर रचनाकार रमेश मस्कर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, माजी नगरसेवक संजय मोहिमे, शिवाजीराव कवाळे उपस्थित होते.
शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. हि मोहिम दिनांक 17 मार्च 2022 पासून महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये आजअखेर 1458 टन गाळ उठाव करण्यात आलेला आहे. काढलेला गाळ 279 खेपाद्वारे आयवा व डंपरच्या सहाय्याने जागेवरुन उठाव करण्यात आला आहे. शहरातील साधाणत: लहान मोठया नाले सफाईचे 78 टक्के काम पुर्ण झाले आहे. उर्वरीत राहिलेल्या 21 प्रभागातील गाळ काढणेचे काम 30 में पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.