गांधीनगर आवाज इंडिया प्रतिनिधी कपिल घाटगे
गडमुडशिंगी ता. करवीर येथे दि. २१ जून रोजी आरोग्यवर्धिनी केंद्र, गडमुडशिंगी येथे ८वा आंतरराष्ट्रीय योग दिन आरोग्यवर्धिनी केंद्र प्रमुख डॉ. अमित सोहनी,राजेंद्र भुजंगे,शारदा पोवार, मेघा शिंदे,डी.बी. कोरे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाने संपन्न झाला.
यावेळी आष्टांग योग संस्थेचे योग प्रशिक्षक कानिफनाथ पंढरे यांनी सहभागी नागरिकांकडून योग प्रोटोकालचा अभ्यास करून घेतला. त्याचबरोबर आसन, प्राणायामचे आरोग्यसाठीचे महत्व रुग्णांना पटवून देत योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये प्रमाणित योग प्रशिक्षकांकडून योग प्रशिक्षण सत्र प्रत्येक आठवड्याला आयोजित करून प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये अनेक जण उत्साहाने सहभागी होऊन लाभ घेतात.
योग दिनाच्या निमित्ताने आरोग्य केंद्रातील स्टाफ, रुग्ण व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदविला.