+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule20 Sep 22 person by visibility 139 categoryशैक्षणिकशैक्षणिक
असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी

कोल्हापूर: इंग्लिश मिडियम स्कूल असोसिएशन (इम्सा) च्या वतीने 'नवीन राष्ट्रीय धोरण व शाळांची भूमिका' या विषयवार चर्चा सत्राचे आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी अध्यक्ष पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंतजी असगावकर हे लाभले असून प्रमुख वक्ते शिक्षण तज्ञ , माजी परीक्षा विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूरचे  डॉ .बी . एम.हिर्डेकर मार्गदर्शन करणार आहेत. 

माध्यमीक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर व प्राथमिक शिक्षण अधिकारी  श्रीमती अशा उबाळे यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार आयोजित केला आहे . सदर कार्यक्रम येत्या शुक्रवारी दि.२३ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता राम गणेश गडकरी सभागृह, न्यू महाद्वार रोड, पद्माराजे हायस्कूल जवळ कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश नायकुडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


इंग्लिश मिडियम स्कूल असोसिएशन (इम्सा) हि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संस्थाचालक , मुख्याध्यापक व शिक्षकांची संस्था असून याद्वारे शाळांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जातात . कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण ४०० हून अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून ६००० हून अधिक शिक्षक कार्यरत आहेत . शहरापासून ते गावा - गावांपर्यंत अत्याधुनिक शिक्षणाची सुविधा पोहचविण्याचे महत्वपूर्ण कार्य या शाळांद्वारे केले जाते. पत्रकार परिषदेस महेश पोळ, के. डी.पाटील,एन.एन.काझी, नितीन पाटील,एम. आर.पाटील, विल्सन वास्कर, सचिन नाईक आदी उपस्थित होते.