+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द
schedule14 Sep 22 person by visibility 196 categoryआरोग्य
असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी 

कोल्हापूर : भारतीय जैन संघटना कोल्हापूर, डॉ.डी वाय पाटील कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कोल्हापूर, जैन डॉक्टर फेडरेशन आणि डॉ.शीतल पाटील फाउंडेशन कोल्हापूर, व कृष्णा डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात दिनांक 24 व 25 सप्टेंबर 2022 या कालावधीत मोफत प्लास्टिक सर्जरी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती आज भारतीय जैन संघटनेचे मार्गदर्शक पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 स्व.डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ डॉ. राजालाल (अमेरिका) यांच्यामार्फत गेली १२ वर्षापासून कोल्हापुरात हा उपक्रम राबविला जात आहे.

ही संघटना गेली अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात एक NGO म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत आपत्ती निवारण,सामूहिक विवाह सम्मेलन, स्मार्ट गर्ल, एज्युकेशन एम्पॉवरमेंट, मायनॉरिटी सेल, बिझनेस डेव्हलपमेंट, बिट्टू बी व बीटू सी वर्कशॉप, जोडप्यांचे सक्षमीकरण, पाणी आडवा व पाणी जिरवा कार्यशाळा, मूल्यवर्धन पहिली ते चौथी अभ्यासक्रम, अशा प्रकारचे अनेक सामाजिक क्षेत्रात जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांनी हातभार लावला आहे.

स्व. डॉ.शरदकुमार दीक्षित यांनी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराच्या माध्यमातून गेल्या 43 वर्षात तब्बल तीन लाख शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.त्यांच्या निधनामुळे मानवसेवेचा हा महायज्ञ त्यांचे अमेरिकेतील शिष्य डॉ.राजालाल व त्यांचे डॉ. सहकारी यांनी चालू ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक 24/9/2022 ते दि. 25/9/2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 5 दरम्यान डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल, कदमवाडी रोड कोल्हापूर येथे डॉक्टर राजालाल यांचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 या शिबिरात दुभंगलेले ओठ व चेहऱ्यावरील विद्रूपकरण यासह चेहऱ्यावरील डाग, नाक व कान या यावरील बाह्य व्यंग, पापण्यांमधील विकृती अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जाणार असल्याची माहिती पारस ओसवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 या शिबिरासाठी दिनांक 24/9/ 2022 पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.यासाठी नाव नोंदणी भारतीय जैन संघटनेचे बसंत बहार रोडवरील कार्यालय, संघवी हॉस्पिटल भवानी मंडप,डी वाय पाटील कॉलेज कदमवाडी या ठिकाणी करण्यात येणार आहे.

डॉ. शीतल पाटील फाउंडेशन कृष्णा डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराचा लाभ सर्व समाजातील रुग्णांनी घ्यावा असे आवाहन जैन संघटनेचे मार्गदर्शक पारस ओसवाल, अभिनंदन खोत, गिरीश भाई कर्नावट, प्रोजेक्ट चेअरमन डॉ.शीतल पाटील, पश्चिम महाराष्ट्र माजीअध्यक्ष प्रकाश मुगली, व नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषभ छाजेड यांनी केले आहे. तर या पत्रकार परिषदेत राजाभाई शहा व बीजेएसच्या सदस्य उपस्थित होते.