असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : " जागतिक हृदय दिनाचे औचित साधून हृदय रोगाबाबत असणारे समज व गैरसमज याबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ करवीर आणि डॉ .शिंदे सुपरस्पेशिअलिटी हार्ट क्लिनिक कोल्हापूर यांच्या वतीने हृदया विषयी जाहीर व्याख्यान आणि कार्यशाळा , शनिवार दि . ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वा . शाहू स्मारक भवन , दसरा चौक , कोल्हापूर येथे आयोजित केले आहे . तरी याचा सर्वानी लाभ घ्यावा . रो उदय पाटील , रो . दिलीप शेवाळे , रो . स्वप्नील कामत , रो . राजू शिंदे यांनी व्याख्यान आणि कार्यशाळेबाबतची भूमिका विशद केली.
दि १ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा . प्रमुख पाहुणे श्री तानाजी दिगंबर सावंत , वरीष्ट्र पोलीस निरीक्षक , जिल्हा विशेष शाखा , कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते सदर व्याख्यान आणि कार्यशाळेचे उदघाटन होणार आहे . तसेच प्रमुख उपस्थिती श्री. वसंतराव मुळीक , उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच कोल्हापूरचे सुप्रसिदध हृदयरोगतज्ञ व डॉ . शिंदे सुपरस्पेशिअलिटी हार्ट क्लिनिक , कोल्हापूरचे डॉ . आलोक शिंदे हे हृदयरोगाबद्दल मार्गदर्शन करतील . तसेच कोल्हापूर मधील सुप्रसिदध आहारतज्ञ रुफिना कुटिन्हो या " आरोग्यदायी हृदयासाठी आहार " याबद्दल मोलाचे मार्गदर्शन करतील . तसेच या कार्यशाळेमध्ये CBC , BSL R. Creat Lipid Profile HbA1C अशा रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरामध्ये करण्यात येणार आहेत . त्याच बरोबर ECG Echo या चाचण्या आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन देखील मिळणार आहे . पत्रकार परिषदेस क्लबचे अध्यक्ष उदय पाटील, सचिव स्वप्निल कामत रो.निलेश भादुले, रो. प्रवीणसिंह शिंदे आदी उपस्थित होते.