+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule09 Jan 23 person by visibility 104 category

आंतरजातीय,आंतरधर्म विवाहामुळे सामाजिक सलोखा : आप्पालाल नायकवडे

आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहीतांचा सन्मान सोहळा

कोल्हापूर
 आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह मुळे सामाजिक सलोखा वाढतो. रोटी बेटी व्यवहार करण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. असे प्रतिपादन पापालाल नायकवडे यांनी केले.
 लक्ष्मीपुरी येथील संतराम पाटील श्रमिक हॉलमध्ये आंतरजातीय, आंतरधर्मीय, विवाह करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सोहळ्याची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पुजनानी केली.
समाजात जातीय दंगली वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशावेळी आंतरजातीय आंतर धर्मीय विवाह करणाऱ्यांचा सत्कार करून शांतता निर्माण करण्याचे काम पुरोगामी लोक करत आहे असे मत अनेक वक्तांनी व्यक्त केले. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह मुळेअडचणी आल्या असल्या तरीसामाजिक सलोख्याचे काम केलं असल्याची प्रतिक्रिया सत्कारमूर्तींनी व्यक्त केल्या.


 यावेळी अध्यक्ष कृष्णा चौगुले, उपाध्यक्ष जालंदर जमादार, अनंत कुलकर्णी, धोंडीबा कुंभार,विलास लोखंडे, प्रकाश कांबरे, श्रमिक संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे, लता कदय आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वागत श्रमिक संघटनेचे विश्वास साळोखे यांनी केले.आभार जमादार यांनी मांनले.
प्रकाश जाधव यांनी सूत्रसंचालन केले.