+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या adjustविकसित भारताच्या संकल्पासाठी गगनबावड्याची जनता मंडलिकांच्या पाठीशी
schedule03 Dec 21 person by visibility 210 categoryउद्योग
कोल्हापूर ता.03 : शहरातील फेरीवाल्यांसाठी सोमवार, दि.6 ते 11 डिसेंबर २०२१ पर्यंत ११ ते ३ या वेळेत गांधी मैदान येथील बाळासाहेब खराडे हॉल येथे स्वनिधी से समृध्दी या शिबिराचे महापालिकेच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिका अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.स्वनिधी योजनेची अमलबजावणी सुरु आहे. या योजने अंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांना रु.10000/- पर्यंतचे कर्ज दिले जात आहे. आतापर्यंत शहरातील 4949 इतक्या फेरीवाल्यांनी याचा लाभ घेतला आहे. या योजनेचा पुढील टप्पा म्हणून स्वनिधी से समृद्धी हे शिबीर राबविले जात आहे. ज्या लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पात्रतेनुसार कर्ज प्राप्त झाले आहे. अशा लाभार्थ्यांनां पी.एम.जीवन ज्योती बीमा योजना, पी.एम. सुरक्षा बीमा योजना, पी.एम.जनधन योजना, पी.एम.श्रमयोगी मानधन, रजिस्ट्रेशन अंडर BOCW, वन नेशन वन रेशन कार्ड, पी.एम.मातृवंदना योजना, जननी सुरक्षा या शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेचा लाभ देणेसाठी कर्जप्राप्त पथविक्रेता व त्यांच्या कुटुंबाचे सामाजिक आर्थिक सर्व्हेक्षण केले जात आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याचा पहिल्या आठवड्यात शिबीर आयोजित करून एकाच ठिकाणी सर्व योजनेचा लाभ पात्रतेप्रमाणे दिला जाणार आहे. ज्या पथविक्रेत्यांचे कर्ज मिळाल्या नंतर सामाजिक आर्थिक सर्व्हेक्षण झालेले आहे, अशांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच ज्यांना १०,०००/- कर्ज मिळाले आहे, पण सामाजिक आर्थिक सर्व्हेक्षण झालेले नाही, अश्या पथविक्रेत्यांचे सामाजिक आर्थिक सर्व्हेक्षण शिबीराच्या ठिकाणी करण्यात येईल. तरी स्वनिधी से समृद्धी शिबीराचा लाभ सर्व फेरीवाल्यांनी घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
schedule31 Jul 21 person by visibility 237 categoryसामाजिक
कोल्हापूर  : शहरातील फेरीवाल्यांसाठी सोमवार दि. २ ते ७ ऑगस्ट २०२१ पर्यंत ११ ते ३ या वेळेत गांधी मैदान येथील बाळासाहेब खराडे हॉल येथे स्वनिधी से समृध्दी या शिबिराचे महापालिकेच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. महानगरपालिका अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत पी.एम.स्वनिधी योजनेची अमलबजावणी सुरु आहे. या योजने अंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांना रु. 10000/- पर्यंतचे कर्ज दिले जात आहे. आतापर्यंत शहरातील 4666 इतक्या फेरीवाल्यांनी याचा लाभ घेतला आहे. 
या योजनेचा पुढील टप्पा म्हणून स्वनिधी से समृद्धी हे शिबीर राबविले जात आहे. ज्या लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पात्रतेनुसार कर्ज प्राप्त झाले आहे. अशा लाभार्थ्यांनां पी.एम.जीवन ज्योती बीमा योजना, पी.एम. सुरक्षा बीमा योजना, पी.एम.जनधन योजना, पी.एम.श्रमयोगी मानधन, रजिस्ट्रेशन अंडर BOCW, वन नेशन वन रेशन कार्ड, पी.एम.मातृवंदना योजना, जननी सुरक्षा या शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेचा लाभ देणेसाठी कर्जप्राप्त पथविक्रेता व त्यांच्या कुटुंबाचे सामाजिक आर्थिक प्रोफायलिंग केले जात आहे. त्यानंतर प्रत्येक महिन्याचा पहिल्या आठवड्यात शिबीर आयोजित करून एकाच ठिकाणी सर्व योजनेचा लाभ पात्रतेप्रमाणे दिला जाणार आहे. ज्या पथविक्रेत्यांचे कर्ज मिळाल्या नंतर सामाजिक आर्थिक प्रोफायलिंग झालेले आहे, अशांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. तसेच ज्यांना १०,०००/- कर्ज मिळाले आहे, पण सामाजिक आर्थिक प्रोफायलिंग झालेले नाही, अश्या पथविक्रेत्यांचे सामाजिक आर्थिक प्रोफायलिंग शिबीराच्या ठिकाणी करण्यात येईल. तरी स्वनिधी से समृद्धी शिबीराचा लाभ सर्व फेरीवाल्यांनी घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे