+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या adjustविकसित भारताच्या संकल्पासाठी गगनबावड्याची जनता मंडलिकांच्या पाठीशी
schedule04 Jun 22 person by visibility 398 categoryउद्योग

पावनखिंड : (पांडुरंग सोनू कांबळे)
वरून काटेरी पण आतून गोड अशा फणसाची झाडें कडवी, कासारी भागात फळांनी भरून लगडली आहेत. गोड, मधुर असे फळ म्हणजे फणस. हे फळ सह्याद्रीच्या पश्चिम डोंगररांगा मध्ये घाट माथ्यावर पाहावयास मिळते.
 शाहूवाडी तालुक्यात आंबा, केर्ले, वारूळ, गजापूर, मांजरे, मोसम, येळवण जुगाई, अणुस्कुरा, पणूद्रे, म्हाळसवडे, बरकी, चांदोली आदी भागात ही झाडें भरपूर प्रमाणात आहेत. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी बुंध्यापासून ते शेंड्यापर्यंत या झाडाच्या खोडावर फळे येतात.
 या फळाचे कापा व बरका असे दोन प्रकार असतात. कापा फणसाला ग्राहकांची सर्वात जास्त मागणी असते. मुंबईला जाणारे सर्व चाकरमानी फणस आवर्जून सोबत घेताना दिसत आहे. विशाळगड, पावनखिंड या ऐतिहासिक ठिकाणी पर्यटन करायला येणारे पर्यटक करवंद, जांभूळ, फणसाचे गरे, आंबे, अश्या रानमेव्याचा आस्वाद उघड्या जीपमध्येबसून घेत आहेत. मलकापूर येथील बाजारपेठेत फणसांची विक्री जोमात सुरु आहे.