Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडशैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोससीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागरडि. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन* डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

आयर्विन ख्रिश्चन मैदानावर कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट

schedule28 Dec 24 person by visibility 119 category


कोल्हापूर /प्रतिनिधी : डी.जे.अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूरमध्ये  लंडन ब्रिज,युरोपियन स्ट्रीट एक्झीबीशन भरविण्यात आले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या डी.जे.अँम्युझमेंटने यावर्षी कोल्हापूरकरांना आता एक नवी नगरी घेऊन आले आहेत ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहूब चित्रांच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहे.आणि लंडन ब्रीज वरून जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथील अर्विन  ख्रिश्चन मैदानावर ही पर्वणी पाहण्यास मिळणार आहे.अशी माहिती जयप्रकाश आणि रवींद्रनाथ,रवी नायर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या नव्या नगरीचे उद्घाटन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.याठिकाणी उभा करण्यात आलेला लंडन ब्रीज हा १८० फुटाचा आहे.याची उंची ४५ फूट आहे तर रुंदी १५ फूट आहे.याचबरोबर चित्रांच्या माध्यमातून विद्युत रोषणाई  करून युरोप सिटी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
याठिकाणी लहान मुले ते सर्व वयोगटातील लोक धमाल मस्ती आणि मनोरंजन  करणार आहेत.जायंट व्हील, कोलंबस, ड्रॅगनट्रेन, ब्रेक डान्स,मोठा पाळणा इत्यादींमध्ये आनंदाने राइड करू शकणार आहेत.तर मुलांसाठी पेडलबोट, जंपिंग, मिनी ट्रेन इत्यादी अनेक मनोरंजक राइड्स आहेत. घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, कूलिंग भांडी, मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे.शिवाय पुस्तकांचाही स्टॉल आहे ज्याठिकाणी डिस्काउंट मध्ये पुस्तके खरेदी करता येणार आहेत.याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्नॅक्स, पॉप-कॉर्न, कॉटन कँडी, सोलापुरी, पाणीपुरी, चाट, उटीचिल्ली बज्जी, कूलड्रिंक्स, आईस्क्रीम, चिल्ली गोबि मिरची भजी खाण्यास मिळणार आहेत.शिवाय सेल्फीही काढता येणार आहे.तरी कोल्हापूर मध्ये प्रथमच आलेल्या या नगरीस कोल्हापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.यावेळी गजानन मोटे उपस्थित होते.


लंडन ब्रीज विषयी माहिती

" लंडन ब्रिज " हे नाव रोमन काळापासून लंडन शहर आणि मध्य लंडनमधील साउथवार्क या दरम्यान टेम्स नदीवर पसरलेल्या अनेक ऐतिहासिक क्रॉसिंगचा संदर्भ देते . सध्याचे क्रॉसिंग, जे १९७३ मध्ये वाहतुकीसाठी खुले झाले, हा काँक्रिट आणि स्टीलपासून बनलेला बॉक्स गर्डर पूल आहे. याने १९ व्या शतकातील दगडी कमानीच्या पुलाची जागा घेतली, ज्याने ६०० वर्ष जुन्या दगडाने बांधलेल्या मध्ययुगीन संरचनेची जागा घेतली. रस्त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्या बऱ्याच इतिहासासाठी, विस्तृत मध्ययुगीन पुलाने घरे आणि व्यवसायांच्या विस्तृत बांधलेल्या क्षेत्रास समर्थन दिले, शहराच्या ब्रिज वॉर्डचा एक भाग आणि साउथवार्कमधील दक्षिणेकडील टोकाला मोठ्या दगडी सिटी गेटवेने संरक्षित केले. मध्ययुगीन पुलाच्या अगोदर लाकूड पुलांच्या एकापाठोपाठ एक होते, ज्यापैकी पहिला लंडनच्या रोमन संस्थापकांनी ( लंडिनियम बांधला होता

 उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्र व कॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes