Awaj India
Register
Breaking : bolt
अंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथाभारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ सप्टेंबरला जाहीर स*आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीप्रकरणी आरती आंबी पुणे कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार...* *डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला* *‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे**बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड* *आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन*जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

जाहिरात

 

डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती*

schedule12 Aug 26 person by visibility 205 categoryशैक्षणिक

*
 ८९   प्लेसमेंट जॉब ऑफर्स 
 एचपीमध्ये ८.५ लाखांचे सर्वोच्च पॅकेज

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी  कसबा बावडा  अधिकारी प्रदत्त स्वायत्त  विभागातील विद्यार्थ्यांना ३२ हून अधिक नामांकित कंपन्यांकडून ८९ प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त झाल्या असून, एचपी (हेवलेट-पॅकार्ड) मध्ये ८.५ लाख रुपये  सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे.

यावर्षी एचपी (हेवलेट-पॅकार्ड), इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस , टेक महिंद्रा, कॉन्सेन्ट्रिक्स, फोक्सवॅगन इंडिया, ग्लोलॉजिक्स सोल्युशन्स, टेस्टयंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्स, ऍपमोसिस  टेक्नॉलॉजीज , वॉलस्टार  टेक्नॉलॉजीज  यांसह अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विभागातील विद्यार्थ्यांची निवड केली.

लॉन्चड ग्लोबल  या कंपनीने विभागातील २५ विद्यार्थ्यांची निवड करून सर्वाधिक भरती करणारी कंपनी ठरली. त्याखालोखाल अनलॉक्स  ने १४ विद्यार्थ्यांची, तर वॉलस्टार  टेक्नॉलॉजीज ने ८ विद्यार्थ्यांची आणि ग्लो लॉजिक्स प्रा.लि. ने ४ विद्यार्थ्यांची निवड केली. याशिवाय एज्यु व्हर्सिटी , टेस्ट यंत्रा , टेक महिंद्रा , टी.सी.एस , इन्फोसिस  आदी अनेक कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, कोडिंग प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, करिअर काउन्सेलिंग तसेच प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण नियमितपणे दिले जाते. याचबरोबर उद्योग–महाविद्यालय सहकार्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्लेसमेंट उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होत असल्याचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी सांगितले.

नुकतेच महाविद्यालयाला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) मानांकन प्राप्त झाले असून शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही मिळाला आहे. या दोन्ही मान्यतांमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली असून, भविष्यात अधिकाधिक नामांकित कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी महाविद्यालयाला प्राधान्य देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, विभागप्रमुख डॉ. गणेश व्ही .पाटील , प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे यासाठी योगदान लाभले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कसबा बावडा -निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. संजय डी पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. ए. के. गुप्ता, श्रीलेखा साटम,  डॉ. संतोष चेडे, डॉ. एल. व्ही. मालदे, प्रा. सुदर्शन सुतार,  प्रा. मकरंद काईंगडे, प्रा. डॉ.गणेश पाटील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes