Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडशैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोससीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागरडि. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन* डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

जागतिक पर्यटन दिन:' पर्यटनाचा पुनर्विचार'

schedule28 Sep 22 person by visibility 484 categoryसंपादकीय

जागतिक पर्यटन दिन:' पर्यटनाचा पुनर्विचार'

आज 27 सप्टेंबर 'जागतिक पर्यटन दिन' म्हणून जगभर साजरा केला जात आहे. या वर्षीची संकल्पना ' पर्यटनाचा पुनर्विचार' अशी आहे. पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी नवनवीन ठिकाणी भेट देणे, स्थानिक गोष्टीची माहिती जाणून घेणे, पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन करणे, रोजगार निर्मिती अशी उद्दिष्टये ठेवून हा दिन साजरा केला जातो. प्राचीन काळापासून प्रवास हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. नवीन प्रदेशांचा शोध घेणे, पर्यावरणीय बदल पहाणे, धार्मिक ठिकाणांना भेट देणे, निसर्गरम्य व थंड हवामानाची ठिकाणे भेट देणे, समुद्रकिनारे, गडकोट व किल्ले, कृषीसमृद्ध प्रदेश, ग्रामीण संस्कृती इत्यादी ठिकाणांना भेट देऊन आनंद पर्यटनाच्या माध्यमातून मिळविला जातो. पर्यटनामुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. भारताचे भौगोलिक स्थान, प्राकृतिक रचना, ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक ठिकाणे व पर्यटन स्थळे विविध असली तरी जागतिक स्तरावर देश पहिल्या दहा देशाच्या यादीत नाही. 

देशातील पर्यटन स्थळांच्या विकासाचा आराखडा, ग्रामीण पर्यटन स्थळे विकसित करणे गरजेचे बनले आहे व त्यातूनच ग्रामीण विकास व रोजगाराची संधी निर्माण होईल. हेरिटेज पर्यटन स्थळांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये ताजमहल, सिमला, कुलु, मनाली, नैनिताल, मुन्नार, दार्जीलिंग, लेह, लडाख, गोवा, अंदमान व निकोबार, मैसूर, बेंगलोर, उटी, बदामी, हंप्पी, उदयपूर, जयपूर, वाराणसी, गंगटोक, कोडाईकॅनॉल, कान्हा नॅशनल पार्क, अमृतसर, लक्षद्वीप, माउंट आबू, हैदराबाद, कच्छ रण, अजंठा वेरुळ, इत्यादी महत्वाची आहेत. महाराष्ट्र हे राज्य ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक व औद्योगिक दृष्ट्या विकसित आहे व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा व समृद्ध परंपरा आहे. सह्याद्रीच्या रांगेत विविध गडकोट किल्ले आहेत. रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, अजिंक्यतारा व आदी किल्ले ऐतिहासिक ठेवा आहेत. पर्यटनाच्या अनुषंगाने हे महत्त्वाचे आहेत त्यामुळे त्यांचा विकास व संवर्धन महत्वाचे आहे. धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, आळंदी, नागपूर-दीक्षाभूमी, नाशिक-त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, सप्तशृंगी, शिर्डी, शनिशिंगणापूर व इतर हे ही महत्वाची ठिकाणे आहेत. थंड हवेची ठिकाणे म्हणून महाबळेश्वर, पाचगणी, आंबोली, माथेरान, लोणावळा, खंडाळा, पन्हाळा व चिखलदरा इत्यादी पर्यटन स्थळे महत्वाची आहेत. कोल्हापूर , सांगली व सातारा हे जिल्हे पर्यटन स्थळाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर, जोतिबा, पन्हाळा, आदमापूर, राधानगरी, आंबोली, शिरोळ- नृरसिंहवाडी, खिद्रापूर, गगनबावडा, भुदरगड व अन्य ठिकाणे पर्यटनाच्या उद्देशाने महत्वाची आहेत. सांगली जिल्हातील चांदोली अभयारण्य, सागरेश्वर, प्रचिती गड, सागरेश्वर, शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर, गुढे पाचगणी, आटपाडीतील खरसुंडी सिद्धनाथ मंदिर, शुक्राचार्य व माणदेशातील लेखक त्यांची गावे व इतर ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. सातारा जिल्हातील महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, कोयना धरण परिसर, कराड, शिखर शिंगणापूर, गोंदवले, मायणी अभयारण्य व सातारा जिल्हातील गडकोट किल्ले आदी ठिकाणे महत्वाची आहेत. राज्यातील जिल्हा व तालुका स्तरावर पर्यटन स्थळांचा विकास झाला तर ग्रामीण विकास व रोजगार निर्मिती साठी मदत होईल. ग्रामीण पर्यटनाला संधी निर्माण होऊ शकते. विविध प्रकारच्या शेतीक्षेत्राला भेट, ग्रामीण जीवन व संस्कृती, ग्रामीण भागातील भौगोलिक ठिकाणे विकसित करण्याची संधी आहे. गाव-तालुका येथे लोकल पर्यटन स्थळ विकसित होऊ शकते.गावातील नदी परिसर, डोंगर, जंगल, शेती, पठारी प्रदेश लोकल मंदिरे या माध्यमातून पर्यटन होवू शकते.भौगोलिक भागानुसार आहारातील दर्जेदार पर्दाथ बनविले की त्या भागात खाद्य संस्कृतीमुळे पर्यटन विकसित होईल म्हणजेच उदा. कोल्हापूर मटणाचा तांबडा-पांढरा रस्सा व मिसळ साठी प्रसिध्द आहे. त्याचप्रमाणे इतर भागातील वैशिष्टयेनुसार पदार्थ निर्माण केलेतर खाद्य पदार्थांची ठिकाणे म्हणून काही गावे विकसित होतील व ग्रामीण भागात रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. खाद्य संस्कृती स्थळामुळे पर्यटन वाढीस मदत होईल. ग्रामीण भागातील विविध ठिकाणांची माहिती प्रसिध्द करणे, पर्यटन नकाशे तयार करणे, वाहतुकीच्या सोयी, हाॅटेल सुविधा, खरेदी सुविधा, आरोग्याच्या सुविधा व इतर काही सुविधा थोड्या फार प्रमाणात निर्माण केल्या तर गाव, तालुका, जिल्हा यापध्दतीने पर्यटन व्यवसायाला गती प्राप्त होईल.कोरोनाचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर झालेला आहे म्हणून शाश्वत पर्यटन विकासासाठी भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.  

डाॅ युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण अभ्यासक
कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes