Awaj India
Register
Breaking : bolt
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल

जाहिरात

 

प्रकाश कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कार

schedule04 Apr 25 person by visibility 438 categoryसामाजिक

कोल्हापूर; येथील कृती फाउंडेशन यांच्या वतीने चंदुर (ता. हातकणंगले) येथील प्रकाश शंकर कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कार देण्यात येणार आहे. रविवारी (दि.6)  साडेचार वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
कांबळे यांनी यापूर्वी इचलकरंजी कामगार आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संघटक म्हणून सुद्धा सक्रिय सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी तिने कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप यासह त्यांची ने-आण करणे, यासह विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे.
आंबेडकरी चळवळीत सहभाग असल्याकारणाने त्यांचा मानगाव परिषद या ठिकाणी सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. यासह पार्टीच्या संविधान जागृती उपक्रमात सुद्धा त्यांनी सहभाग नोंदविला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून सुद्धा त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपत्र देण्यात आलेले आहे. प्रहार या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes