Awaj India
Register
Breaking : bolt
कॉल्पोस्कोपी आणि पॅथॉलॉजी व स्त्रीरोग संघटनेच्या वतीने तीन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजनरविवारी गुणवंताचा सत्कारअशोक कांबळे यांना यावर्षीचा आदर्श मुकनायक पुरस्कारडॉ. सुमेध कांबळे यांना यावर्षीचा आदर्श मुकनायक पुरस्कारप्रकाश कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारशिवाजी भिमाजी परळीकर यांना संविधान प्रसारक आदर्श मूकनायक पुरस्कारशिवाजी भिमाजी परळीकर यांना संविधान प्रसारक आदर्श मूकनायक पुरस्कारचंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयीमच्छिंद्र कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कारप्रा. प्रमोद झावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जाहिरात

 

डॉ. सुमेध कांबळे यांना यावर्षीचा आदर्श मुकनायक पुरस्कार

schedule04 Apr 25 person by visibility 615 categoryसामाजिक

कोल्हापूर;
येथील कृती फाउंडेशन यांच्यावतीने मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील डॉ. सुमेध सदाशिव कांबळे यांना या वर्षीचा आदर्श मुकनायक पुरस्कार देण्यात येत आहे.
डॉक्टर कांबळे यांचे वैद्यकीय शिक्षण कर्नाटकमध्ये झाले. वैद्यकीय क्षेत्रात आल्यापासून त्यांनी प्रत्येक गरीब रुग्णांना सहकार्य करण्याचे काम केलेले आहे.गावातच लोकांना सेवा उपलब्ध व्हावी, म्हणून त्यांनी सौम्या क्लिनिक सुरू केले आहे.
डॉक्टर कांबळे यांनी खानापूर, मडिलगे, गारगोटी परिसरात महिलांना पुरुषांना मोफत आरोग्य सुविधा दिली. कोरोनाकाळात सुद्धा त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली.
मठगावच्या एका गरीब विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलिया सिडनी येथे उच्च शिक्षणासाठी त्यांनी स्वतः 25 हजार रुपयांची मदत केली. यासह कांबळे यांनी शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा यांचा प्रसार, प्रचार करण्यासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवलेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes