+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमेट्रोसिटीच्या धर्तीवर कोल्हापूरचा विकास ही छत्रपती घराण्याची दूरदृष्टी adjustकोल्हापुरात प्रमुख नेत्याची लोकसभेच्या रिंगणातून माघार adjustदिल्लीच्या संसदेत कोल्हापूरचे शाहूच adjustश्री शाहू छत्रपतींचा उद्या उमेदवारी अर्ज; शक्‍तीप्रदर्शनाबाबत जनतेत कमालीची कुतूहलता, राज्याचे लक्ष adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद
schedule10 Mar 23 person by visibility 70 category


 


जीजेसी नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा सत्कार

कोल्हापूर– सराफ व्यावसायिकांसाठी विशेषतः युवा पिढीसाठी आश्वासक, आवश्यक ठरणारी लाभम कार्यशाळा व जीजेसीच्या नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या सत्काराचे आयोजन येत्या शनिवारी (ता. ११) येथे केल्याची माहिती जीजेसीचे विभागीय समिती सदस्य भरत ओसवाल व कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी संयुक्त दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्राप्रमाणे सराफ व्यवसायातही आमूलाग्र बदल झाला आहे. पारंपरिक चालणाऱ्या या व्यवसायात नवतंत्रानाच्या सहाय्याने दागिना अधिकाधिक उठावदार होत आहे. त्याचबरोबर व्यवसायातही बदलही खूप झालेत. तसेच हॉलमार्किंग, शासकीय नियम, किचकट कायदेकानून, टॅक्स यामुळे व्यवसाय करू की याकडे लक्ष देऊ, अशी आजची स्थिती आहे. या दृष्टीनेच या व्यवसायासमोर असणाऱ्या समस्या, अडचणींचा आढावा घेण्यासाठी लाभम कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

ते म्हणाले, कोल्हापुरात प्रथमच तरुण व युवा पिढीचे नेतृत्व करणारे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे (जीजेसी) नूतन अध्यक्ष संयम मेहरा व उपाध्यक्ष राजेश रोकडे येत आहेत. त्यांचे व्यावसायिक अनुभव पश्चिम महाराष्ट्रातील सराफ व सुवर्णकारांसमोर व्यक्त करतील शिवाय एकूणच आढावाही घेतील.

या दोघांबरोबरच जीजेसीचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल, दिलीप लागू, लाभमचे निमंत्रक साहील मेहरा, चार्टर्ड अकौंटंट भाविन मेहता यांचेही यावेळी मार्गदर्शन होईल. कार्यशाळेसाठी फक्त कोल्हापूरच नाही तर सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि बेळगाव येथील व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत. जीजेसीच्या नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांचा पश्चिम महाराष्ट्रातील सराफ संघांच्या वतीने भव्य नागरी सत्कार होईल.

दरम्यान, यावेळी जीजेसीच्या वतीने मुंबई (गोरेगाव) येथे होणाऱ्या प्रदर्शनाची नोंदणीही करण्यात येणार आहे. महाराजा बँक्वेट हॉल, लोणार गल्ली वसाहत, मार्केट यार्ड येथे सकाळी १०.३० वाजता कार्यशाळा होईल. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सराफ व सुवर्णकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही दोघांनी यावेळी केले.