+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात रंगणार "लोकनाथ चषक" भव्य क्रिकेट स्पर्धेचा थरार adjust कुंभी कासारी आणि नरके पॅनल याची विश्वासार्हताच पॅनलला विजयी करेल adjustसभासदांच्या विश्वासामुळे नरके पॅनलच्या विजय निश्चित adjust**कोल्हापुरात 2 फेब्रुवारीला "संघर्ष" राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा adjust भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस पाटलाला मारहाण adjustपशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये महत्वपूर्ण बदल आणि अनुदानात भरघोस वाढ. adjustरोटरी क्लब ऑफ करवीर च्या वतीने अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे आयोजन adjust.. कोल्हापुरातील मटका पोलिसांच्या ब्रँडच्या काळ्या गॉगल मधून दिसणार काय adjustपश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी प्रदर्शन २०२३* या प्रदर्शनास आजपासून होणार प्रारंभ adjustइंडियन डेअरी फेस्टिवलचे शुक्रवारी उद्घाटन
schedule08 Aug 21 person by visibility 14367 categoryसामाजिक

      स्वरा फौंडेशन आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात काम करते. त्याचबरोबर आज संपूर्ण राज्यभर वृक्षप्रेमी संघटना म्हणून अल्पावधीत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसे पाहायला गेले तर या फौंडेशनची सुरुवात 2014 साली झाली.आणि एक एक करत सदस्य संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. 

सुरुवातीला कोणतेही नाव नसताना सामाजिक कार्य करत करत 2016 साल उजाडले तरी कोणतेही नाव दिले गेले नाही; पण 9 आगस्ट 2016 साली प्रमोद माजगावकर यांच्या घरी मुलीने जन्म घेतला आणि तिचे नाव स्वरा ठेवण्यात आले. सर्व सदस्यांनी ठराव केला की स्वरा चे नाव या फौंडेशन ला देण्यात यावे. सर्वांच्या विनंती मान्य करून स्वरा प्रमोद माजगावकर हिच्या नावाने या फौंडेशन ला स्वरा फौंडेशन हे नाव देण्यात आले.
        प्रमोद माजगावकर यांनी आपल्या राजकन्येच्या नावाने काही वर्षांपूर्वी सुरु केलेलं स्वरा फाऊंडेशन नावच रोपटं आज एका महाकाय वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. असे सांगण्याचे कारण म्हणजे स्वरा फौंडेशन ने फक्त वृक्षारोपण न करता सध्या असलेल्या वृक्षाचे संगोपन सुद्धा करत आहेत. याचे उदाहरण द्यायचे झाले तर कोल्हापूर जिल्ह्यात अवैध वृक्षतोड यावर आक्रमक भूमिका घेऊन भल्या भल्यांना आज घाम फोडला आहे. हे फौंडेशन फक्त फौंडेशन नसून सामान्य माणसाला जगण्याचा आधार देणारं फौंडेशन म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

स्वरा फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी शासनातर्फे शत कोटी वृक्षलागवड केली जाते. ह्या उपक्रमात स्वरा फाउंडेशनचा मोलाचा सहभाग असतो. स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका माजी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी महास्वच्छता अभियानात स्वछता करुन वृक्षारोपण ही स्वरा फौंडेशनच्या माध्यमातून केले गेले अनेक आठवडे हा उपक्रम खंड न पडता सुरू आहे.
      स्वरा फौंडेशनने आतापर्यंत पर्यावरणच न पाहता याही पलीकडे आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात ही मोलाचे कार्य केले आहे आणि साऱ्या जिल्ह्याने आणि राज्याने त्यांना या कार्याबद्धल पुरस्कारांनी सन्मानित ही केले आहे.
    2019 च्या महापुराच्या काळात कोल्हापूर महापुराने हादरून गेले होते.त्यावेळी या फौंडेशन ची रेस्क्यू फोर्स सामान्यांच्या मदतीला धावून आली होती.निम्मे कोल्हापूर पाण्याने वेढलेले असताना पाणी वीज नव्हती त्यावेळी स्वरा फौंडेशन मार्फत पाणी बॉटल, जेवण, ब्लॅंकेट ,टँकर, सर्वांसाठी दिले होते.पूर ओसरल्यानंतर ज्या भागात पुराचे पाणी आले होते तेथे गाळ मोठ्या प्रमाणात साचला होता त्यावेळी गाळ काढण्यासाठी जे. सी. बी, ट्रॅक्टर ,औषध फवारणी व इतर साहित्य दिले होते. त्याबरोबर नागरिकांचे आरोग्याच्या बाबतीत हाल होऊ नये म्हणून मेडिकल कॅम्प व औषधे मोफत वितरण केले होते.
      कोरोना महामारीच्या काळात सारं जग घरात बसले होत. तेव्हा स्वरा फौंडेशनचे सभासद रस्त्यावर सामाजिक कार्यात गुंतले होते. पोलीस प्रशासनाला पाण्याचे तसेच जेवणाचे वाटप, आणि नागरिकांना त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, हँड सॅनिटायझर वाटप हे कार्य संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक,दिल्ली येथे सुरू आहे.
    ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी तो प्राशन करेल तो गुर्गुरल्या शिवाय राहणार नाही . ह्याच उक्तीप्रमाणे शैक्षणीकरीत्या अनेक भागात जाऊन विद्यार्थ्याना वह्या , पुस्तके वाटप करण्याचं काम ही स्वरा फौंडेशन करत आहे.त्याचबरोबर एप्रिल 2020 साली जयंती नदी चा गाळ काढण्यासाठी पोकलांड मशीन चा इंधनाचा खर्च ही उचलला होता त्यामुळे जयंती नदी चे पाणी पात्रातच राहिले त्यामुळे पुराची परिस्थिती ऊदभवली नाही अविरत पणे रात्र आणि दिवस स्वरा फौंडेशन आणि त्यांची जवळपास हजारो सभासद आणि पदाधिकाऱ्यांची टीम सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत असते . स्वराचे आज कार्य सांगायचे झाले तर खूप आहे.
       आशा या स्वरा प्रमोद माजगावकर हिला वाढदिवसाच्या संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याकडून लाख लाख शुभेच्छा मोठी होऊन स्वराही आपल्या मम्मी पप्पा सारखे सामाजिक उपक्रमात भाग घेऊन दिनदुबळ्यांच्या मदतीला धावून जाऊन तिच्याकडून मदत मिळावी आणि पुढील तिच्या आयुष्यास खूप साऱ्या शुभेच्छा !