शैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी
schedule28 Nov 25 person by visibility 13 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : मनपा नेहरूनगर विद्या मंदिर क्र. ६१ येथील स.शिक्षिका सौ. शैलजा शिवाजी पाटील या २१ वर्षांपासून अखंड सेवाभावाने कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तावृद्धीत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. मनपा आदर्श शिक्षिका, डी. डी. आसगावकर ट्रस्टचा आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच रोटरी क्लबचा नेशन बिल्डर अवॉर्ड त्यांच्या नावावर आहेत.
इयत्ता ५वीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल ९१ विद्यार्थी घडविले असून ४ विद्यार्थी नवोदयसाठी पात्र करण्यात यश. विशेष म्हणजे सन 2023-24 मध्ये तब्बल ६४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक घडविण्याचा विक्रमी मान त्यांच्या नावावर. या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन मनपामार्फत आयोजित पहिल्या ISRO अभ्यासदौऱ्यासाठी त्यांची निवड झाली.
निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता २री गणित विषयासाठी निपुण व्हिडीओ निर्मिती करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली.
पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या संकल्पनेतून सलग सहा वर्षे “करू पर्यावरणाचे संरक्षण – साजरे करू इको फ्रेंडली सण” हा उपक्रम राबवून जिल्हास्तरीय यश मिळविले.
फक्त पंधरा दिवसांत पालकांकडून ₹४५,००० निधी उभारून वर्ग-परिसराचा कायापालट, तसेच प्रत्येक पालक बैठकीत वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी आवाहन करत आजवर १५० पुस्तके वर्ग वाचनालयात जमा करण्याचे श्रेयही त्यांना जाते.
दैनिक सकाळ NIE संवाद उपक्रमात प्राथमिक शिक्षक गटातून सलग दोन वर्षे त्यांचे लेखन पारितोषिक विजेते, तर शालेय सामुदायिक कवायत स्पर्धेतही त्यांनी केलेले मार्गदर्शन उल्लेखनीय ठरले.
विद्यार्थी, पालक आणि समाजात सकारात्मकता व गुणवत्तेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या शिक्षिका सौ. शैलजा पाटील यांची कामगिरी खरोखरच प्रेरणादायी मानली जात आहे.