+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule02 Jul 22 person by visibility 11797 categoryराजकीय
आवाज इंडिया प्रतिनिधी

 कोल्हापूर

          कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेमध्ये सेवानिवृत्त झालेले दादा लाड हे नेतृत्व कशासाठी करीत आहेत ? . त्यांनी नैतीकता शिकावी. त्यांची कोजिमाशितील एकाधिकारशाही व मक्तेदारी संपुष्टात आणा असे आवाहन विरोधी राजर्षि शाहू आघाडीचे उमेदवार बाबा पाटील यांनी प्रचार दौऱ्यात सभासदांना केले .
            श्री. पाटील पुढे म्हणाले ' कोजिमाशि पतसंस्था कोणी निर्माण केली ? कोणी वाढवली ? हे सूज्ञ सभासदांना माहिती आहे . पण या संस्थेला गिळंकृत करण्याचे काम ठराविक चौकडीकडून सुरु आहे जे सेवेतून निवृत्त झाले आहेत ते या संस्थेचे राजकारण व सत्ताकारण पहात आहेत हे संस्थेचे व सभासदांचे दुदैव आहे . संस्था सक्षमपणे चालवणारी मंडळी शिक्षण वर्तुळात असताना ठराविकांचीच मक्तेदारी का ? जे एक -दोन वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत व जे दहा पंधरा वर्ष संचालक मंडळात सत्ता भोगत आहेत त्यांनाच सत्ताधाऱ्यांनी उमेदवारी का दिली आहे ? अन्य कोण लायक नाही का ? दादा लाड आणि कंपनी या संस्थेत निर्माण झाली आहे . सभासद हित न पाहता ते मित्रहित जास्त जपतात त्यातच त्यांचे कटकारस्थान पहायला मिळते .
          सभासदांची दिशाभूल करून संस्थेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या मंडळींपासून वेळीच सावध राहिले पाहिजे . सभासदांनी भूलथापांना बळी न पडता राजर्षि शाहू आघाडीच्या पाठीशी ठाम राहून दादा लाड यांची या संस्थेतील मक्तेदारी मोडून काढावी असेही श्री . बाबा पाटील यांनी आव्हान केले .
         मोठा जनसंपर्क व प्रचंड लोकसंग्रह
         असणाऱ्या उमेदवारास डावलल्याचे आश्चर्य !

       कोजिमाशिचे सभासद प्रिय संचालक असणारे व ज्यांचा मोठा जनसंपर्क व प्रचंड लोकसंग्रह आहे . ज्यांच्याकडे स्वकर्तृत्व आहे अशा बिद्रीच्या दूध साखर कनिष्ठ महाविद्यालयचे प्रा .एच .आर . पाटील (कोनवडेकर ) यांना सत्ताधारी दादा लाड यांनी उमेदवारी डावलली याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे . श्री .पाटील हे भुदरगड तालुक्यातील असले तरी त्यांचा शाहूवाडी पन्हाळ्यापासून चंदगडच्या टोकापर्यंत सातत्यपूर्ण संपर्क आहे . सभासदांच्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होणाऱ्या व अडीअडचणीला कधीही धावून येणाऱ्या , कोरोनाकाळात व महापूराच्या काळात सामान्यांना आधार देणाऱ्या जिल्हयातील साडेआठशे शाळापैकी सातशे शाळांशी सतत संपर्क असणाऱ्या विद्यमान संचालक प्रा . एच . आर .पाटील यांना उमेदवारी डावलल्याने सभासदात प्रचंड नाराजी पसरली आहे . त्यांची या निवडणूकीत परिणिती निश्चित दिसणार आहे . त्यांची भूमिका काय राहाणार ?याची सभासद वर्गात जोरदार चर्चा सुरू आहे . त्यांच्या भूमिकेवरच या निवडणूकीचा कल व भवितव्य ठरणार असल्याचे बोलले जात आहे . त्यामूळे प्रा . पाटील हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले .