Awaj India
Register
Breaking : bolt
राजवर्धन दिनकर यादव यांनी संरक्षण सेवेत घडवला इतिहासअस्मिता धनंजय दिघे : बहुआयामी सामाजिक-राजकीय नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवासउत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम अंगणवाडी सेविका सौ. रेखा चव्हाण यांचे उत्कृष्ट कार्यम्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील अंगणवाडी सेविकेचे उल्लेखनीय कार्यबहुजन पत्रकारितेचे चार दशके : प्रा. अंकुश गोविंद वाकडेआदर्श माजी सैनिक रोहित कृष्णदेव कदम यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीयस्वखर्चातून उभारलेले महामाता भिमाई–रामजी आंबेडकर स्मारक सामाजिक बांधिलकीचे प्रतीकसेवेचा व संवेदनशीलतेचा समतोल : सुमेधा प्रभू इंगळे विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समर्पित कार्य : संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि दक्षिना स्कूलचा प्रेरणादायी प्रवास

जाहिरात

 

राजवर्धन दिनकर यादव यांनी संरक्षण सेवेत घडवला इतिहास

schedule29 Jan 26 person by visibility 32 categoryसामाजिक

 कोल्हापूर:
पन्हाळा तालुक्यातील उंडी येथील मूळ असलेले, गोव्यात जन्मलेले व वाढलेले राजवर्धन दिनकर यादव यांनी अखिल भारतीय संरक्षण सेवा परीक्षांमध्ये ऐतिहासिक यश मिळवत गोवा व महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उज्वल केले आहे. भारतीय हवाई दलातील पायलट पदासाठी तसेच भारतीय तटरक्षक दलातील असिस्टंट कमांडंट पदासाठी एकाचवेळी शिफारस मिळवणारे ते मानकरी ठरले आहेत.
रेइश मागोस, वेरेम–गोवा येथील रहिवासी असलेल्या राजवर्धन यादव यांनी पहिल्याच प्रयत्नात दोन्ही लेखी परीक्षा, SSB, PSB व FSB यांसह कठीण वैद्यकीय चाचण्या यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या. ही कामगिरी त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांची आणि आत्मविश्वासाची साक्ष देणारी ठरली आहे.
राजवर्धन यांचे वडील श्री. दिनकर यादव आकाशवाणी व दूरदर्शन, गोवा क्लस्टरमध्ये श्रोता अनुसंधान अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबातील शिस्तप्रिय वातावरण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा याचा त्यांच्या जडणघडणीवर सकारात्मक प्रभाव दिसून येतो.
शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्य
शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उज्ज्वल ठसा उमटवत राजवर्धन यांनी प्रधानमंत्री केंद्रीय विद्यालय, INS मांडवी येथून CBSE दहावी परीक्षेत 10/10 CGPA मिळवले. तसेच LIC (गोवा) ‘स्टुडंट ऑफ द इयर – 2017’ पुरस्काराचे ते मानकरी ठरले. पुढे त्यांनी गोवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीची पदवी संपादन केली.
क्रीडा क्षेत्रातही ते तितकेच चमकले. विजय मर्चेंट ट्रॉफीसाठी गोवा राज्याच्या U-16 क्रिकेट संघात उजव्या हाताचे लेग स्पिनर म्हणून त्यांनी सहभाग घेतला. KV INS मांडवीच्या U-16 संघाचे कर्णधारपद त्यांनी भूषवले असून GCA-B डिव्हिजन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रतिष्ठित पणजीम जिमखान्याचे आजीवन सदस्यही ते आहेत.
राष्ट्रसेवेच्या दिशेने पुढचे पाऊल
सध्या राजवर्धन यादव भारतीय हवाई दलाच्या अकादमीत पायलट प्रशिक्षणासाठी दाखल झाले आहेत. त्यांचे हे यश गोवा, महाराष्ट्र तसेच परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
राजवर्धन दिनकर यादव यांना मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांचे यश देशातील युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणास्थान ठरणारे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes