म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील अंगणवाडी सेविकेचे उल्लेखनीय कार्य
schedule28 Jan 26 person by visibility 10 categoryशैक्षणिक
कोल्हापूर :
म्हासुर्ली (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील अंगणवाडी क्र. 159 येथील सेविका सौ. शुभांगी शिवाजी पाटील यांनी विविध सामाजिक व शासकीय उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण केलेल्या सौ. पाटील यांनी अंगणवाडीच्या माध्यमातून बालविकासात मोलाची भूमिका बजावली आहे.
मेंदूचा विकास उपक्रम अंतर्गत त्यांनी मेंदूमध्ये असणारी गुंतागुंतीची रचना समजावून सांगत लहान बालकांचा मेंदूचा विकास कसा साधता येईल, याचे प्रत्यक्ष कृतीतून प्रभावी सादरीकरण करून दाखवले. या उपक्रमामुळे पालक व बालकांमध्ये शिकण्याविषयी जागरूकता वाढली आहे.
कोरोना काळात त्यांनी कोरोना फायटर म्हणून सर्व्हेचे काम पार पाडत प्रशासनाला मोलाची मदत केली. तसेच BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) म्हणून कामकाज करताना मतदान जनजागृती कार्यक्रम राबवून मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण केली. याशिवाय पोलिओ लसीकरण मोहिमेतही त्यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शैक्षणिक पात्रता, सामाजिक बांधिलकी आणि कार्यातील तत्परता यांचा संगम असलेल्या सौ. शुभांगी शिवाजी पाटील यांचे कार्य हे अंगणवाडी सेविकांसाठी प्रेरणादायी ठरते.