धम्म व सामाजिक परिवर्तनाचा अखंड प्रवास : आयु. अनिल केशव माळवी यांचे प्रेरणादायी कार्य
schedule20 Jan 26 person by visibility 10 categoryसामाजिक
धम्म व सामाजिक परिवर्तनाचा अखंड प्रवास : आयु. अनिल केशव माळवी यांचे प्रेरणादायी कार्य
किसरुळ (ता. पन्हाळा) येथील आयु. अनिल केशव माळवी हे सामाजिक व धम्मकार्याच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले एक अभ्यासू व कृतीशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. **मासिक ‘क्रांतीपर्व’**चे संपादक म्हणून गेली दहा वर्षे ते बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची ज्योत तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत.
महोदय शाहू–फुले–आंबेडकर विचारांचा वसा व वारसा जपत सामाजिक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेत, वंचित व उपेक्षित घटकांमध्ये जनजागृतीचे कार्य ते अविरतपणे करीत आहेत. २०१८ पासून ‘२२ प्रतिज्ञा अभियान’ या माध्यमातून ग्रामीण भागातील गावोगावी जाऊन धम्मकार्याबरोबरच प्रबोधनपर मांडणी करीत तरुणाईच्या वैचारिक परिवर्तनासाठी ते प्रयत्नशील आहेत.
या उल्लेखनीय कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे. कवी सरकार वाचन मंदिर, इंगळी यांच्याकडून त्यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच युवाक्रांती प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय धम्मनिनाद फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने २२ प्रतिज्ञा अभियानसाठी २०२४ चा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. वाघवे (ता. पन्हाळा) येथे झालेल्या धम्म परिषदेच्या निमित्तानेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कारांपुरते न थांबता, समाजपरिवर्तनाच्या ध्येयाने प्रेरित होऊन धम्मकार्य व सामाजिक प्रबोधन हेच जीवनकार्य मानत आयु. अनिल केशव माळवी आजही सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण व युवक वर्गात वैचारिक जागृती वाढत असून, समतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचत आहे.