Awaj India
Register
Breaking : bolt
मैत्री दुनियेतील राणी – रूपाली पाटीलडी. वाय. पी. साळोखेनगर मध्ये रविवारी "सतेज मॅथ्स स्कॉलर" परीक्षेचे आयोजन*डी.वाय. पाटील च्या नव्या तंत्रज्ञानाला पेटंट चुये येथे आज पासून श्री दत्त जयंती सोहळा महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे कर्तृत्ववान मुख्याध्यापिका सौ. सुहासिनी उदय कदम यांचा प्रेरणादायी प्रवासआदर्श व्यक्तिमत्व मुख्याध्यापक आत्माराम विश्वनाथ सोनोने धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा आदर्श शिक्षक जनार्दन मधुकर कांबळे सर : विद्यार्थ्यांच्या घडवणुकीसाठी समर्पित कार्यशैलजा पाटील यांची उल्लेखनीय कामगिरी

जाहिरात

 

मैत्री दुनियेतील राणी – रूपाली पाटील

schedule31 Dec 25 person by visibility 17 categoryलाइफस्टाइल

 
मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळी असते;
ती आपुलकीने जोडलेली, विश्वासाने घट्ट झालेली असते.
अशीच मैत्री जपणारी, निभावणारी आणि जगणारी तू आहेस –
मैत्री दुनियेतील राणी, रूपाली पाटील.
सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे काय,
हे तुझ्या वागण्यातून, तुझ्या कृतीतून रोज दिसतं.
मित्र-मैत्रिणींचा विषय निघाला की
कोणतीही अट नाही, कोणतीही अपेक्षा नाही,
फक्त मनापासून पुढे येणारी तू…
फोन करून सगळ्यांना एकत्र आणणारी,
तयारीपासून ते भेट संपेपर्यंत
सगळं आनंदाने सांभाळणारी – .
मैत्रीत माया, काळजी, वात्सल्य जपणारी तू
खऱ्या अर्थाने प्रेमळ मैत्रिणी सारखीच आहेस.
 
वर्गातील मित्र-मैत्रिणी असोत,
न्यायालयातील सहकारी असोत,
प्रहार संघटनेतून जोडलेले लोक असोत—
त्यांच्या अडचणीत तू मार्ग काढतेस,
कधी आर्थिक मदत,
कधी भावनिक आधार,
तर कधी फक्त “मी आहे”
असं म्हणत उभी राहतेस.
राणी म्हणजे काय?
राणी म्हणजे नेतृत्व,
राणी म्हणजे कर्तृत्व,
राणी म्हणजे सर्वस्व.
राजकीय वातावरणात अनेकांना वाटतं
की नेता, पुढारी किंवा राजा
सगळ्या समस्या सोडवतो.
पण खऱ्या अर्थाने एक राणी अशीही असते
जी प्रकाशात नसते,
पदावर नसते,
आभारांची अपेक्षाही करत नाही…
तरीही आपल्या आसपासच्या
अनेक वंचितांना न्याय देते,
  तिच्या विश्वात राणीचं खऱ्या अर्थाने जीवन जगते आणि सर्वांना आधार देण्याची भूमिका निभावते तीच खरी राणी असते मग ती पडद्याआडची का असेना राणी राणीच असते 
 हे येते कुठून... संस्कार
एकञ कुटुंब असलेल्या आदर्श घरातून मिळतात…
आजी नवसा आई पासून ते
जी. आर. पाटील सरांच्यापर्यंत
 भाऊ, बहीण, शेजारी, पाजारी आणि 
तुझ्या सहवासातील सर्वांनी 
ज्यांनी प्रेमाने, आपुलकीने
तुला घडवलं,
त्या संस्कारातून घडलेली
संस्कारशील मुलगी
आज स्वतःच्या क्षेत्रात
निःस्वार्थपणे नेतृत्व करते.
म्हणूनच अभिमानाने म्हणावंसं वाटतं—
तू आहेस मैत्री दुनियेतील राणी,
शेवटी तुझ्याविषयी इतकंच म्हणता येईल फ. मू. शिंदे यांनी आई विषयी एका कवितेत म्हटलेलं आहे 
आई खरंच काय असते? लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते, धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही !
 याच पद्धतीने मैत्रीण खरच काय असते? लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते, धरणीची ठाय असते
मैञिण असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही !
 
रूपाली पाटील.
💐 तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक,
 खूप खूप शुभेच्छा!
तुझं आयुष्य असंच प्रेमाने,
यशाने आणि आनंदाने भरलेलं राहो.
तू जशी आहेस तशीच
सदैव हसत-खेळत
सगळ्यांसाठी नेतृत्व करणारी “राणी” राहो. 👑✨
 
प्रशांत चुयेकर
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes