अस्मिता धनंजय दिघे : बहुआयामी सामाजिक-राजकीय नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवास
schedule29 Jan 26 person by visibility 18 category
कोल्हापूर:
कांचनवाडी (ता. करवीर) यांच्या कर्तबगार माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्या मा. अस्मिता धनंजय दिघे यांनी प्रशासन, समाजकारण, महिला सक्षमीकरण आणि बहुजन चळवळीत भरीव योगदान देत एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
सध्या त्या सरपंच संघटनेच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.द लित युवा महिला संघर्ष आघाडीच्या संस्थापिका, तसेच पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीच्या अधिक्षक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, हक्कांसाठी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे.
ग्रामीण महिला अर्थसक्षमीकरणासाठी त्या बचत गट मास्टर ट्रेनर (जि.प.) व सरपंच मास्टर ट्रेनर (जिल्हा परिषद) म्हणून मार्गदर्शन करत आहेत. तसेच लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र – उपाध्यक्ष, प्रा. धनंजय फाउंडेशन, जिल्हा कोल्हापूर – संस्थापिका आणि दक्ष नागरिक समाज कल्याण संघटना – महाराष्ट्र पोलीस केंद्रीय महिला सुरक्षा अधिकारी या नात्यानेही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
राजकीय क्षेत्रात त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत बहुजन, दलित, महिला व युवा वर्गाच्या प्रश्नांना व्यासपीठ दिले आहे.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये विश्वरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवप्रबोधनी सन्मान, भारती संविधान जागृती व स्त्री शक्ती सन्मान (२०२३), सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार (२०२२), श्रावस्ती समाजसेविका राज्यस्तरीय गौरव (२०२०), क्रांतीज्योती पुरस्कार, शाहू पुरस्कार, स्टाईल आयकॉन अचिव्हर अवॉर्ड (२०२३ व २०२४) यांचा समावेश आहे.
तसेच विविध साहित्य संमेलने, सांस्कृतिक मंच, सामाजिक अधिवेशने व संघटनांकडून २०१३ पासून सतत त्यांचा सन्मान होत आला आहे.
सामाजिक परिवर्तन, महिला सबलीकरण आणि घटनात्मक मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या अस्मिता धनंजय दिघे यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, पुढील काळात त्यांचे कार्य अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.