Awaj India
Register
Breaking : bolt
वंचितांचा एकच वादा : न्याय देणारा उत्तम दादा राजवर्धन दिनकर यादव यांनी संरक्षण सेवेत घडवला इतिहासअस्मिता धनंजय दिघे : बहुआयामी सामाजिक-राजकीय नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवासउत्कृष्ट समाजसेविका मा. राणी मॅडम अंगणवाडी सेविका सौ. रेखा चव्हाण यांचे उत्कृष्ट कार्यम्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील अंगणवाडी सेविकेचे उल्लेखनीय कार्यबहुजन पत्रकारितेचे चार दशके : प्रा. अंकुश गोविंद वाकडेआदर्श माजी सैनिक रोहित कृष्णदेव कदम यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीयस्वखर्चातून उभारलेले महामाता भिमाई–रामजी आंबेडकर स्मारक सामाजिक बांधिलकीचे प्रतीकसेवेचा व संवेदनशीलतेचा समतोल : सुमेधा प्रभू इंगळे

जाहिरात

 

वंचितांचा एकच वादा : न्याय देणारा उत्तम दादा

schedule04 Feb 26 person by visibility 31 categoryराजकीय

कोल्हापूर :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांचा आज वाढदिवस विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात येतो. वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा.
 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे यांनी गेली कित्येक वर्षे वंचित, उपेक्षित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण संघर्ष केला असल्याचे दिसून येते.
आंबेडकरी विचारांना केंद्रस्थानी ठेवत त्यांनी समाजप्रबोधनासाठी अनेक उपक्रम व कार्यक्रम राबवले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार, संविधान मूल्यांचे संरक्षण आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. आयुष्यभर त्यांनी मोठ्या पक्षाचा पाठिंबा दिला, मात्र त्या पक्षाकडून त्यांना अपेक्षित मान-सन्मान किंवा पद कधीच मिळाले नाही, ही त्यांच्या आयुष्यातील मोठी खंत मानली जाते.
सहकार क्षेत्रातही त्यांनी निवडणूक लढवली, मात्र तेथेही अपेक्षित यश त्यांच्या वाट्याला आले नाही. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात अनेक पक्ष सत्ताधारी होण्याच्या उद्देशाने दादांची मदत घेतात, मात्र निवडणुका झाल्यानंतर त्यांनाच दुर्लक्षित करण्याचा किंवा हरवण्याचा प्रयत्न केला जातो, अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
तरीही या सर्व उपेक्षा व संघर्षांवर मात करत उत्तम दादा कांबळे यांनी कधीही आपला मार्ग सोडला नाही. उपेक्षित जनतेला न्याय देण्याचे कार्य आपण प्रामाणिकपणे केले, याच समाधानात त्यांनी आपले राजकीय व सामाजिक जीवन घडवले आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा, भविष्यातही आंबेडकरी चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी व सामाजिक न्यायासाठी ते असेच अग्रभागी राहतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes