Awaj India
Register
Breaking : bolt
सवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेटकळंब्याचा कायापालट; विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन! एक कॉल, प्रॉब्लेम सॉल' प्रतिमेमुळे बाबा नांदेकर ठरताहेत जनतेचे आधारस्तंभकोल्हापुरात उद्या 'पशुधनातील संतुलित आहार व वैरण पीक लागवड' तांत्रिक कार्यशाळा शिक्षक पदोन्नीतीस शिक्षक समिती सदस्यांचा विरोध गोकुळ च्या बदनामी विरोधात बुधवारी शेतकरी बंधू समावेत आत्मक्लेश आंदोलन -डॉ. युवराज येडूरे शाळेतील मुलांवर मोबाईलचे दुष्परिणाम

जाहिरात

 

महापुरुषांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत : कौस्तुभ गावडे

schedule30 Nov 25 person by visibility 848 categoryशैक्षणिक

कृती फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत शिक्षक शिक्षिका प्राध्यापक अंगणवाडी यांचा सत्कार 
 कोल्हापूर 
 महात्मा फुले यांचे विचार शालेय अभ्यासक्रमात असावेत. महापुरुषांची ओळख पुस्तकातून झाली तर भविष्यात पिढी सुद्धा योग्य घडेल असा विश्वास स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केले.
 ते रविवारी (दि. 30) राजर्षी शाहू स्मारक भवन येथे 
कृती फाउंडेशन यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे यांनी महात्मा फुले यांच्या विचारावर व्याख्यान दिले.
 गावडे म्हणाले, आपल्या देशाची परंपरा जगात एक नंबर आहे. महापुरुषांनी घालून दिलेले विचार देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. महात्मा फुले यांनी गरिबांना शिक्षणाची सोय केली शिक्षकांनी सुद्धा समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मदत केली तर शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थाने पुढे जाईल.
स्वप्नपूर्ती गृह प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद हर्षवर्धन यांनी शिक्षकांनी समाज घडविण्याचे काम करावे असे आवाहन केले.
  यावेळी जनार्दन कांबळे, दत्तात्रय पाटील, सचिन परीट, श्रीकांत गावकर, यांनी मनोगत व्यक्त केली.
कृती फाउंडेशन यांच्यावतीने आदर्श शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक प्राध्यापक यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
सूमन कांबळे, एस पी दीक्षित, स्नेहल घाडीवडकर, दत्तात्रय पाटील, सुकेश पाटील, ज्योती कांबळे, सुनंदा मुसळे, शैलजा पाटील, हिरामणी कांबळे, श्रीकांत गावकर, सचिन परीट, अरविंद कांबळे, यशवंत सरदेसाई, लता यादव, सविता पाटील, सोपान वाघमारे, सुरेंद्र टिके, दत्तात्रय बोटे, संगीता वायदंडे, जनार्दन कांबळे, अनिता सातवेकर, शिल्पा गवळी, धनश्री मोहिते, आत्माराम सोनाने, सुहासिनी कदम यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
 यावेळी प्रा. डॉ.युवराज मोठे, प्रा. डॉ. रामचंद्र कांबळे, प्रशांत चुयेकर,अश्विनी चुयेकर उपस्थित होते.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes