Awaj India
Register
Breaking : bolt
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीरअंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*नवीन शैक्षणिक धोरणातील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्या

जाहिरात

 

करवीरचे माजी तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार आदींनी संगनमताने ६५० कोटींचा माल लांबवला

schedule23 Jul 26 person by visibility 274 categoryगुन्हे

माझ्या हद्दीतील ६५० कोटींचा माल लांबवला!
करवीर तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा आरोप; 
कोल्हापूर:
पंचगंगा महिला खाण मंजूर व औद्योगिक सहकारी संस्था मर्यादा, टोपच्या चेअरमन सौ. पूजा हनुमंत चौगुले यांनी प्रशासनातील अधिकारी आणि काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर उत्खनन करून तब्बल ६५० कोटी रुपयांचा माल लांबवल्याचा दावा त्यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. मागण्या मान्य कराव्या यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात त्या उपोषणाला बसल्या आहेत 
भागीदारांची नावे:
चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेल्या बेकायदेशीर उत्खननात खालील व्यक्ती भागीदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे:
१) शिवाजी आनंदा पोवार (रा. गंगातीर्थनगर - अध्यक्ष, मी वडार महाराष्ट्राचा संघटना)
२) आनंद पाटील - माजी खणीकर्म अधिकारी (कोल्हापूर)
३) जी. गुरुप्रसाद - माजी उपवन संरक्षक (कोल्हापूर)
४) सुनील गायकवाड - सहा. पोलीस निरीक्षक, MIDC शिरोली
प्रकरणाची पार्श्वभूमी व आरोप:
पत्रकात नमूद केल्यानुसार, सौ. पूजा चौगुले यांच्या हद्दीमध्ये ४५,००० ब्रास बेकायदा उत्खनन झाल्याचा ठपका ठेवून २२ कोटींची नोटीस बजावण्यात आली होती. सन २०२३ मध्ये त्यांचे काम बंद करून करवीर तहसीलचे स्वप्निल  रावडे यांनी शिवाजी पोवार यांच्याशी संगनमत केले. त्यानंतर स्वतःची यंत्रणा लावून शिवाजी पोवार यांच्यामार्फत उत्खनन सुरू ठेवण्यात आले.
गेल्या २ वर्षांत जवळपास १५ ते २० लाख ब्रास माल लांबवण्यात आला आहे. तावडेंच्या दराने या मालाची किंमत अंदाजे ६५० कोटी रुपये होते.
उपोषणाचा इशारा:
माझ्या हद्दीतील ६५० कोटींच्या मालाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने, मंगळवार दि. २७/०१/२०२६ पासून आमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा सौ. पूजा हनुमंत चौगुले (चेअरमन, पंचगंगा महिला खाण मंजूर व औद्योगिक सहकारी संस्था मर्या. टोप) यांनी दिला आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes