तंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरी
schedule02 Sep 26 person by visibility 9 categoryशैक्षणिक
कागल : शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे शिक्षक शहाजी वामन गायकवाड यांनी आपल्या २८ वर्षांहून अधिक शैक्षणिक सेवेत उल्लेखनीय कार्य केले आहे. तंत्रस्नेही शिक्षक म्हणून कागल तालुक्यात त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
गायकवाड यांचा जन्म १ जून १९७२ रोजी झाला असून त्यांनी ३० डिसेंबर १९९७ रोजी शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यांची शैक्षणिक पात्रता एम.ए., बी.एड. असून त्यांनी डी.एस.एम. हा अतिरिक्त अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांनी Microsoft Certified Educator हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचा शिक्षकांसाठीचा ‘AI शिक्षक साथी’ हा अभ्यासक्रमही यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. सन २०११ मध्ये मुंबई येथे कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले. तालुकास्तरीय विविध प्रशिक्षणांमध्ये त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सातारा सैनिक स्कूल प्रवेशासाठी यश संपादन केले आहे.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांच्या शाळेने केंद्रामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी इन्फोसिस कंपनीच्या CSR निधीतून शाळेसाठी १० संगणक उपलब्ध करून घेत संगणक प्रयोगशाळा उभारण्यात पुढाकार घेतला. ही संगणक प्रयोगशाळा सध्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मान
शहाजी गायकवाड यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांकडून पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल, इचलकरंजी यांच्याकडून आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, कास्ट्राईब कल्याण महासंघ, कोल्हापूर शाखा कागल यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१, मा. हसन मुश्रीफ फाउंडेशन, कागल यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२, महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ तसेच दैनिक पुढारी यांच्याकडून आदर्श शिक्षक सन्मान २०२६ प्राप्त झाला आहे.
तंत्रज्ञानाची सांगड शिक्षणाशी घालत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक योगदान यामुळे शहाजी गायकवाड हे कागल तालुक्यातील आदर्श व तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ठळकपणे समोर आले आहेत.