Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या* *विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स*बागल चौक दफनभूमीसाठी जेसीबी मशीनचे लोकार्पणबँकांनी पतपुरवठा आराखड्याचे अर्ध वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे*जिल्हा परिषदेत गणेशोत्सव रद्द करू नका; सदस्यांची अध्यक्षांकडे मागणीश्री कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धारचाळीस वर्षे समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे उपमहापौर अक्षय जरग गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स

जाहिरात

 

*डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या* *विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स*

schedule30 Aug 26 person by visibility 1 categoryशैक्षणिक

कोल्हापूर 
 
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना विविध नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून १८५ हून अधिक जॉब ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. हेवलेट-पॅकार्ड (एच पी ) कंपनीमध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना ८.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
 
लॉन्च्ड ग्लोबल या कंपनीने सर्वाधिक ४३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्याखालोखाल अनलॉक्स अकॅडमीने २०, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने १९, इन्फोसिसने १३, टेस्टयंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्सने १०, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ९, एज्यू व्हर्सिटी बंगळुरू ८, सायबर सक्सेस ६, आणि एक्सेलआरने ५ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि., , फॉक्स सोल्युशन्स, मायक्रोलाइज आणि पेगासससह विविध कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली.   
 
विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून आकर्षक पॅकेज मिळाले असून एचपीमध्ये ८.५ लाख रुपये, टीसीएसमध्ये व लॉन्च्ड ग्लोबल ७ लाख, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ६ लाख, पेगासस ५.५ लाख रुपये, फॉक्स सोल्युशन्समध्ये ५.४६ लाख, ४.८ लाख, हेक्सावेअरमध्ये ४ लाख, तर इन्फोसिसमध्ये ३.६ लाख रुपये पॅकेज ऑफर केले आहे.
 
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, कोडिंग प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, करिअर काउन्सेलिंग तसेच प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर भर दिल्याने त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी मिळत आहेत.
 
नुकतेच महाविद्यालयाला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (NBA) मानांकन प्राप्त झाले असून, शिवाजी विद्यापीठाकडून अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही मिळाला आहे. या मान्यतांमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळकटी मिळाली असून, भविष्यात नामांकित कंपन्यांकडून कॅम्पस प्लेसमेंटसाठी अधिक पसंती मिळण्यास मदत होणार आहे.
 
या निवडीसाठी अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, सीएसई विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल , प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
 
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes