Awaj India
Register
Breaking : bolt
चाळीस वर्षे समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे उपमहापौर अक्षय जरग गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळे गावातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवास्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहातकरवीर तालुक्यातील गुंठेवारी प्रकरणांची विशेष चौकशी करा

जाहिरात

 

चाळीस वर्षे समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे उपमहापौर अक्षय जरग

schedule25 Aug 26 person by visibility 56 categoryराजकीय

कोल्हापूर (प्रशांत चुयेकर) 
माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेविका माधवी जरग यांच्या 40 वर्षाची राजकारणाची समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे उप -महापौर अक्षय जरग यांचा आज वाढदिवस.

पारंपरिक पक्षाच्या लढतीमध्ये प्रभागात यशस्वीपणे विजयाचा झेंडा फडकविणाऱ्या अक्षय जरग यांच्याबद्दल कोल्हापुरात कौतुक वाटते. वडिलांनी सुरू केलेल्या समाजकार्याची परंपरा अक्षय यांनी पुढे चालवली आहे.
 25 वर्षापासून  आरोग्य शिबीर भरवत कोल्हापुरात एक वेगळा संदेश जरग कुटुंबीयांनी  दिला आहे. खंडोबा तालीम मंडळाचा अध्यक्ष, काँग्रेसचे जिल्हा शहर उपाध्यक्ष, स्कूल बोर्ड कमिटी आदी पदावर काम करत  विक्रम जरग यांनी कोल्हापूरच्या राजकारणावर वेगळा वचक निर्माण केला आहे. 
 उपमहापौर अक्षय जरग यांना काँग्रेस  पक्षाने निवडणुकीत उमेदवारी नाकारली असली तरी आपण स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो  हे त्यांनी  कोल्हापूरकरांना दाखवून दिले आहे.
 जनसुराजचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे, प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या मदतीने कोल्हापूरच्या विकासाची स्वप्ने त्यांनी रंगवली आहेत.
 कोल्हापूरच्या फुटबॉलला एक वेगळा दर्जा देण्याचे  जरग कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. उपमहापौर पद सांभाळत असताना येणाऱ्या प्रत्येक माणसांची समस्या सोडवण्याचे काम अक्षय जरग करत असतात. थोड्याच दिवसात त्यांनी आपल्या वेगळ्या कामाची चुणूक महानगरपालिकेत दाखवली आहे. यापुढेही कोल्हापूरच्या राजकारणात जरग कुटुंबीय मोठ्या पदावर कार्यरत असेल याबाबत कोल्हापूरकर अपेक्षा बाळगून आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes