Awaj India
Register
Breaking : bolt
स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहातकरवीर तालुक्यातील गुंठेवारी प्रकरणांची विशेष चौकशी करानामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजारसाहेब .... एकच नंबर काम !वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चौदा गाढवांना ताब्यात ६० कोटींच्या बाळूमामा देवस्थान कथित गैरव्यवहारातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन –कोल्हापूरवासीयांना आणखीन चार प्रगत वैद्यकीय सुविधा प्रदान करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दौलत साखर कारखान्यात त्रिपक्षीय वेतन करार लागू करा; नस्ती महानगरपालिकेतून खाजगी ठिकाणी नेणाऱ्यांवर फौजदारी करा माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रि.पा.ई. गवई पक्षाच्या वतीने स्वागत

जाहिरात

 

स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

schedule24 Aug 26 person by visibility 23 category

कोल्हापूर : स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्था मर्या., कोल्हापूरचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास सभासद, संचालक व कर्मचारी वर्गाची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संजय कांबळे सर (के. एम. सी. महाविद्यालय, कोल्हापूर) तसेच डॉ. मोहन गोखले (संस्थापक, देवदांगा मल्टीपर्पज सोसायटी, मुरगुड) उपस्थित होते.
यावेळी अभियंता विजय चौगले, समीर पाटील आणि शहाजी चौगले यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. तसेच प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन, माजी व्यवस्थापक सौ. अनिता कदम, संस्थेचे मार्गदर्शक सुधार कांबळे, महादेव गायकवाड आणि दिपक देवाळेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती माधुरी कांबळे व उपाध्यक्षा सौ. शुभांगी चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यात सभासदांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी हॉटेल रॉयल पार्क, बालिंगा–गगनबावडा रोड, कोल्हापूर येथे हा वर्धापन दिन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संचालक, सभासद व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
 प्रमुख उपस्थिती म्हणून सुहास कांबळे सर, अनिता कदम मॅडम, महादेव गायकवाड, सर्व संचालक भाग भांडवलदार, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित राहिला. या कार्यक्रमाचे निवेदन राजेंद्र कांबळे सर यांनी केले तर प्रस्तावना प्रमोद कांबळे व आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक अमित कांबळे सर यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes