Awaj India
Register
Breaking : bolt
नामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजारसाहेब .... एकच नंबर काम !वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चौदा गाढवांना ताब्यात ६० कोटींच्या बाळूमामा देवस्थान कथित गैरव्यवहारातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन –कोल्हापूरवासीयांना आणखीन चार प्रगत वैद्यकीय सुविधा प्रदान करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दौलत साखर कारखान्यात त्रिपक्षीय वेतन करार लागू करा; नस्ती महानगरपालिकेतून खाजगी ठिकाणी नेणाऱ्यांवर फौजदारी करा माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रि.पा.ई. गवई पक्षाच्या वतीने स्वागत*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची* *तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड*गोकुळ दूध वितरक कमिशन वाढीच्या निर्णयाला विरोध;

जाहिरात

 

नामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजार

schedule23 Aug 26 person by visibility 22 categoryराजकीय

कोल्हापूर :
महसूल मंत्री यांनी आज कोल्हापुरात जनता दरबार घेणार अशी घोषणा करताच* *कोल्हापुरातील हजारो लोक भाबड्या अपेक्षेने दुपारी 1 वाजल्यापासून  मोठी गर्दी करून वाट पाहत होते कि जेणेकरून आपल्याला न्याय मिळेल, परंतु नामदार 4.45  वाजता आले*  *आणि नेहमीप्रमाणे घाई गडबडीत गर्दीत व ढकलाढकलीत निवेदन घेऊन कोल्हापूरकरांची घोर निराशाच केली असल्याची टीका शिवसेनेचे उपनेतेसंजय पवार यांनी केली.
 *नामदार बावनकुळे यांच्या लक्षात आले असेल की त्यांचे महसूल खाते किती निष्क्रिय व भ्रष्ट आहे ज्यांच्याकडे पैसा आणि वशिला आहे त्यांचीच कामे तातडीने* *होतात परंतु सर्वसामान्य लोकांना आपल्या खात्याकडून न्याय मिळत नाही हे आजच्या गर्दीतून कदाचित लक्षात आले असेल.. मागील 10 वर्षाचे ऑडिट केल्यास 50% तहसीलदार जेलमध्ये जातील कारण प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर कामे करून शासनाच्या तिजोरीत जाणारा* *महसूल या लोकांनी व भ्रष्टसाखळीने हडप केला आहे. आपणास विनंती आहे पुढील जनता दरबारात  गर्दी कमी पहायची  असेल तर कोल्हापुरातील महसूल विभागाला प्रामाणिक व सक्षम अधिकारी द्यावेत व वर्षानुवर्षे कोल्हापुरात वशिलाच्या जोरावर ठाण मांडून जे अधिकारी बसले आहेत त्यांची उचल बांगडी करावी अशी मागणी त्यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes