Awaj India
Register
Breaking : bolt
नामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजारसाहेब .... एकच नंबर काम !वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चौदा गाढवांना ताब्यात ६० कोटींच्या बाळूमामा देवस्थान कथित गैरव्यवहारातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन –कोल्हापूरवासीयांना आणखीन चार प्रगत वैद्यकीय सुविधा प्रदान करणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दौलत साखर कारखान्यात त्रिपक्षीय वेतन करार लागू करा; नस्ती महानगरपालिकेतून खाजगी ठिकाणी नेणाऱ्यांवर फौजदारी करा माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे रि.पा.ई. गवई पक्षाच्या वतीने स्वागत*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची* *तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड*गोकुळ दूध वितरक कमिशन वाढीच्या निर्णयाला विरोध;

जाहिरात

 

साहेब .... एकच नंबर काम !

schedule23 Aug 26 person by visibility 18 category

साहेब .... एकच नंबर काम !

 

 
कोल्हापूर दि : 23 (जिमाका) स्थळ ... जिल्हाधिकारी कार्यालय ... , वेळ दुपारची तीन वाजताची ... ,कार्यक्रम तपशील ...महसूलमंत्र्यांनी नागरिकांची निवेदन स्विकारणे .... , उपस्थिती .... जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नागरिकांची ..... आणि परिणीती . ... हजारो नागरिकांच्या चेहऱ्यावर एक विलासी समाधान .
      निमित्त होते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे ... ! आज रविवार असूनही दुपारी दोन नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर हजारो नागरिकांच्या उपस्थितीने गजबजायला सुरुवात झाली ... कारण होते .... राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांचे निवेदन घेणार होते . ..! पर्यायाने जनसंवादाचे ....!
        दुपारी चारच्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. नागरिकांची तोबा गर्दी ....या सर्व गर्दीला दिलासा देण्याचे काम मंत्री बावनकुळे यांच्यामार्फत ....जोपर्यंत शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत हे व्यासपीठ सोडणार नाही अशा शब्दात मंत्री बावनकुळे यांचा नागरिकांना दिलासा ... अन या दिलाश्याबद्दल , साहेब .... ! एकच नंबर ... ! अशा शब्दात उमटलेली नागरिकांची उस्फूर्त प्रतिक्रिया ... आणि साक्षात महसूल मंत्री इतक्या आपुलकीने आपल्या निवेदनाबाबत विचार विनिमय करतात याबद्दल जनतेच्या मनात आंतरिक समाधान ....!
               जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात महसूलमंत्र्यांनी आजच्या या जनसंवाद कार्यक्रमात सुमारे हजारांहून अधिक नागरिकांची निवेदने चेहऱ्यावर कोणताही त्रागा न करता अत्यंत नम्रतापूर्वक स्वीकारली. तसेच या निवेदनाच्या अनुषंगाने नागरिकांना आश्वासक शब्दात दिलासा देणे ... शक्य आहे अशा प्रकरणांबाबत स्पष्ट वस्तुस्थिती कथन करणे आदी बाबी लिलयारित्या पार पाडल्या .
       यावेळेस आमदार सर्वश्री अमल महाडिक, अशोक माने, राहुल आवाडे, शिवाजी पाटील,महापौर रूपाराणी निकम , जिल्हाधिकारी डॉ .विजय राठोड , निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव , महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी , करवीर प्रांत अधिकारी मोसमी चौगुले , डॉ समीर शिंगटे यांच्यासह महसुल भागातील इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes