Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसादसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचा गेल्या हंगामातील रु. १०० चा हप्ता जमा*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कळे गावातील प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवास्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहातकरवीर तालुक्यातील गुंठेवारी प्रकरणांची विशेष चौकशी करानामदार बावनकुळे साहेब यांचा जनता दरबार भेंडी बाजारसाहेब .... एकच नंबर काम !वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चौदा गाढवांना ताब्यात ६० कोटींच्या बाळूमामा देवस्थान कथित गैरव्यवहारातील आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन –

जाहिरात

 

शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

schedule24 Aug 26 person by visibility 1 category

 

कोल्हापूर दि :24  पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आपला बाप्पा... आपल्या हाताने घडवूया!’ या शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
          शहर व ग्रामीण भागातील ४१ शिबिरार्थींनी या कार्यशाळेत सहभाग घेत गणेशमूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण घेतले.कोल्हापूरचे मूर्तिकार गौरव कांईगडे यांनी आपल्या सहकारी प्रथमेेश/शुभम कुंभार तसेच शुभदा कुंभार यांच्यासह शिबिरार्थींना गणेशमूर्ती निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. 
         यावेळी उपस्थित शिबिरार्थींना शाडू मातीचा वापर,मूर्ती घडविण्याची प्रक्रिया तसेच पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्त्व याबाबत मुलांना प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घाटन गौरव कांईगडे व मंगला चौकाककर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. या कार्यशाळेच्या माध्यमातून बालकांमध्ये सर्जनशीलतेसोबतच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.विशेष म्हणजे मुलांचे पालक देखील उस्फूर्तपणे या कार्यशाळेत सहभागी झाले होते.संयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित शिबिरार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. 
             या कार्यशाळेचे आयोजन पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई संचालिका मीनल जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.समन्वयक प्रशांत जोशी यांच्यासह राजेंद्र चौगुले,माधव बोरगावकर,पुष्कर बोरगावकर, कोमल भोसले,जयश्री देसाई यांनी या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

                  ooooo

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes