+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule05 Dec 23 person by visibility 729 categoryराजकीय

आवाज इंडिया

कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)

 कधी बिद्री साखर कारखान्यावर तर कधी राधानगरी विधानसभेवर दावा करणारे ए. वाय. पाटील यांची चांगलीच पिच्छेहाट झाली आहे. बिद्री साखर कारखान्यात माजी आ. के. पी. पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. यामुळे कारखाना आणि विधानसभेतून निवडणुकीतून ए. वाय. बाहेर फेकले असल्याची चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे.
बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांचे दाजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, बिद्रीचे माजी संचालक ए. वाय. पाटील यांनी वारंवार मला कारखाना किंवा विधानसभा उमेदवारी द्या असा हा पक्षश्रेष्ठींच्याकडे हट्ट धरला होता. दरवेळी त्यांची समजूत काढून कारखाना व विधानसभा निवडणुका पार पडल्या जात होत्या.

अनेक वेळा ए. वाय. पाटील यांनी बंड पुकारले मात्र ते बंड काही कालावधीत थंड झाले.यावेळी मात्र त्यांनी के.पी यांना कारखान्यातून बाहेर काढायचे असा चंग बांधला होता. प्रसंगी रक्ताचं नातं सोडून विरोधी आघाडीत सहभागी होणे त्यांनी पसंत केले. किमान कारखाना तरी मिळेल या उद्देशाने त्यांनी के.पी यांच्या विरोधात जोरात प्रचार केला.
मात्र या निवडणुकीत ए. वाय यांच्या पॅनलचा पराभव झाल्यामुळे ते कारखाना सह विधानसभा निवडणुकीतून सुद्धा बाहेर फेकले गेले असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत भविष्यात काय तरी पदरात पडले असते अशी अपेक्षा होती मात्र या पराभवाने ए. वाय पाटील गट मात्र चांगलाच नाराज झालाय.

राष्ट्रवादी काँग्रेस मधून के.पी. यांनाच पसंती

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर माजी आमदार के. पी. पाटील यांचा विधानसभेचा बायोडेटा आता भरभक्कम झाला आहे. जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांची सुद्धा साथ के.पी. पाटील यांनाच असणार आहे.