+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे* *कॉक्लेअर इम्प्लांट मुलांचा मेळावा संपन्न* adjustराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत* *डी. वाय. पाटील अभियांत्रिकी संघ प्रथम* adjustमितभाषी संयमी आणि विकासकामांची जाण असलेल्या अमल महाडिकांना जनता पुन्हा आमदार करेल - महादेव जानकर adjustsamajkalyan;इतर मागास बहुजन कल्याण samajkalyan विभागांतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 5 मार्चपर्यंत अर्ज करा adjustrupalichakanakar,mahilaayog; बालविवाह रोखण्यासाठी विवाहकार्यात सहभागी होणाऱ्यांवरही कारवाई करा adjustgokuldudh sangh;दूध उत्पादकांच्या आर्थिक उत्कर्षा मध्ये गोकुळचे मोठे योगदान ! adjustprakashambedkar,mahavikasaghadi,lokasabha:आपली ताकद बघा आणि मग मागा असे प्रकाश आंबेडकर का म्हणत आहेत adjustdypatil-kolhapur; डी वाय पाटील अभियांत्रीकीच्यावतीने बहिरेश्वर येथे डीजीपीएस- ड्रोनद्वारे नकाशा करण्याची कार्यशाळा संपन्न adjust*भाजपाच्या निवडणूक संकल्प पत्रासाठी सूचना पाठवा : विजय जाधव adjustज्ञानदानाचा वारसा चालविणारे शिंदे कुटुंबीय
schedule27 May 23 person by visibility 212 categoryशैक्षणिकशैक्षणिक

कसबा बावडा/वार्ताहर
बारावीचा ऑनलाईन निकाल गुरुवारी जाहीर झाला असून डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा विद्यार्थी यशवंत चंद्रकांत भोसले याने ९६ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 
  विज्ञान शाखेत स्वरणीका कराळे हिने याने ९२ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून तिला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. प्रतिक पांडुरंग चव्हाण याने ८६.५० टक्के गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. याच शाखेत हर्षवर्धन कवठेकर, दीपश्री पाटील आणि मधुरा कदम या तिघांनी भूगर्भशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
 वाणिज्य शाखेत श्रुती सचिन जोशी हिने ९५.८३ टक्के गुणासह प्रथम क्रमांक मिळवला असून तिला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. निनाद जोशी व मृणाल महाडेश्वर यांनी ९५.६७ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला असून दोघानीही अकौंटन्सी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. अथर्व खटावकर याने ९४.८३ टक्के गुण मिळवत तृतीय स्थान मिळवले.
  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, महाविद्यालयाचे सल्लागार अशोकराव देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.