Awaj India
Register
Breaking : bolt
रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ*डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सर्वसाधारण विजेतेपद*लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील आनदराव पाटील चुयेकर ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७%नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्केडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल ९९.१७ टक्के*मित्र-मैत्रिण नाते किती ग्रेट?निवडणुकीनंतर लाडकी बहीण राज्य सरकारला सावत्र झाली; आमदार सतेज पाटील यांची टिका...शाश्वत दुग्ध व्यवसायासाठी नवनिर्मित तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ; अरुण डोंगळेशालेय आयडी घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे

जाहिरात

 

'दगडी चाळ 2' चित्रपट उद्या प्रदर्शित

schedule18 Aug 22 person by visibility 376 categoryलाइफस्टाइल

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी 

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या दगडी चाळ या चित्रपटाचा दुसरा भाग 'दगडी चाळ 2' उद्या 19 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.पहिल्या भागातील बरेच कलाकार दुसऱ्या भागात पाहायला मिळणार आहेत.या चित्रपटात सूर्या, डॅडी सोनल यांच्या गोष्टीतील नवीन एक्का म्हणजे शकील .सूर्या आणि डॅडी या दोघांच्या वादात आता शकील कहाणी ला काय नवीन वळण आणतोय हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

शकील ची एन्ट्री प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. डॅडी ची ऑफर सूर्या स्वीकारतो की शकील सोबत हात मिळवतो हे गुपित अजून गुलदस्त्यात आहे .शकीलने दिलेली ऑफर सूर्या स्वीकारेल का? याचे उत्तर 19 ऑगस्टला चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे. डॅडी वर्सेस शकील यांचे वैर आणखी कोणत्या थराला जाणार याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केले आहे.नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर खुद्द अरुण गवळी यांच्या हस्ते लाँच करण्यात आला.चित्रपटाची निर्मिती मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर यांनी केली आहे. तर चित्रपटात अंकुश चौधरी ( सूर्या) ,पूजा सावंत ( सोनल ), मकरंद देशपांडे ( डॅडींच्या ) भूमिकेत असून शकीलच्या भूमिकेत अशोक समर्थ पहावयास मिळणार आहेत.दहशत , गँगवॉर,राजकारण , ॲक्शन आणि लव्हस्टोरी पुन्हा एकदा 'दगडी चाळ 2 ' मध्ये प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्ड वाईड प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes