अमल महाडिक यांच्यानंतर दोन महाडिक बंधूंची उमेदवारीसाठी तयारी
schedule26 Oct 24 person by visibility 70 category
कोल्हापूर ; (प्रशांत चुयेकर)
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अमल महाडिक यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून कृष्णराज महाडिक तर शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सम्राट महाडिक यांनी उमेदवारी मागितली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कृष्णराज महाडिक यांची चर्चा सुरू आहे. कृष्णराज महाडिक यांचा युवा वर्ग मोठा आहे. त्यांचे सामाजिक कार्य चांगले आहे. महाराष्ट्रात त्यांना प्रचारासाठी बोलवले तर त्याचा फायदा महायुतीला होईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. धनंजय महाडिक यांच्यानंतर आता कृष्णराज महाडिक सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटले आहेत.
शिराळा विधानसभा मतदारसंघातून महाडिक यांचे बंधू सम्राट महाडिक यांनीही भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. सम्राट महाडिक यांचे नाव सुद्धा चर्चेत आहे त्यामुळे महाडिक कुटुंबातील तीन उमेदवार विधानसभा मतदारसंघात असतील याबाबत उत्सुकता लागली.
याबाबत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, महाडिक कुटुंबातील उमेदवारीचा विचार केला तर आनंदच आहे कारण महाडिक कुटुंब समाजकार्यात कायम अग्रेसर आहे.