Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जा*साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी* *उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे*अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबत कुटुंब आणि समाजाची जबाबदारी प्रज्वल दिलीप पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनसवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेटकळंब्याचा कायापालट; विविध विकासकामांचे थाटात भूमीपूजन! एक कॉल, प्रॉब्लेम सॉल' प्रतिमेमुळे बाबा नांदेकर ठरताहेत जनतेचे आधारस्तंभ

जाहिरात

 

समाजकारणाचा वारसा जपणारे अमल महाडिक यांना विजयी करण्याचा निर्धार

schedule24 Oct 24 person by visibility 457 category



कोल्हापूर आवाज इंडिया

राजकारण हा धंदा न मानता समाजकार्याचा वारसा म्हणून कार्य करणाऱ्या माजी आमदार अमल महाडिक यांना निवडून देण्याचा निर्धार कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांनी केला.


कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात गर्दी केली.


गोरा गोमटा आमदार ब्रह्मनिरास
 खासदार धनंजय महाडिक यांनी गोऱ्या गोमट्या विद्यमान आमदार यांनी जनतेची निराशा केलेली आहे. त्यांचा यावेळी पराभव करा, असे आवाहन केले. माझी पालकमंत्री यांना कपट करायचे फक्त माहिती आहे या सर्वांचा पराभव करायला हवा.

पाच वर्षे कार्यकर्त्याच्या संपर्क संपर्कात राहणारा,
पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून सलग पाच वर्ष मतदारांच्या संपर्कात अमल महाडिक आहे. त्यांनी दीडशे कोटीपेक्षा अधिक विकास कामे केले आहे. महायुतीच्या वतीने त्यांना निवडून द्यावे असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी व्यक्त केला.

 मुश्रीफ यांची सर्व टीम आमल साहेब यांच्यासोबत

पालकमंत्री हसन मुस्लिम यांची सर्व टीम अमल यांच्या सोबत असणार आहे असा विश्वास आदिल फरास यांनी व्यक्त केला.
गतवेळी पराभव होऊन सुद्धा दुसऱ्या दिवसापासून मतदार संघात काय विकास काम करायची हे ठरवून ज्यांनी काम केले ते म्हणजे अमल महाडिक होय. येणाऱ्या 25 दिवसात कष्ट करून त्यांना निवडून देऊया असं जनस्वराजचे जयंत पाटील यांनी सांगितलं.

यावेळी माजी नगरसेवक रूपाताई निकम,प्रताप पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पोतट ढवण, दक्षिण मतदार संघातील महायुती मधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

महादेवराव महाडिक यांचे नाव घेताच जल्लोष
भाजपचे महेश जाधव यांनी माझी पालकमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. कोल्हापुरातील बहुतेक नगरसेवक यांना स्थायी समिती सभापती महापौर, उपमहापौर होता आले ते म्हणजे महादेवराव महाडिक यांच्यामुळे असे त्यांनी सांगितले त्यावेळी टाळ्या आणि शिट्ट्याचा आवाजाने सभागृह दणाणून गेले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes