कोल्हापूर ;
बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात सरकारने यापूर्वीही ठोस निर्णय घेतले आहेत, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिला मेळाव्यात ते बोलत होती. तपोवन मैदान कळंबा या ठिकाणी झालेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बदलापूर घटनेतील आरोपी, संस्थाचालक, पोलीस यांच्यावर कारवाई केलेली आहे.तरीही विरोधक याला हिंसक वळण देत आहेत.हे सरकार संवेदनशील असूनगैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.