Awaj India
Register
Breaking : bolt
चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावरमुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईराधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्षजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकलीजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली​अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवर गुन्हे; कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाईकोल्हापूर पोलीस दलाचे 'ऑल आऊट ऑपरेशन': जिल्ह्यात गुन्हेगारांवर मोठी कारवाई, ठाण्यातील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे* *दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये*

जाहिरात

 

आ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराज

schedule14 Nov 24 person by visibility 584 categoryराजकीय


कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देऊन विजयी करुया असे आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केले. आमदार ऋतुराज  पाटील यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते . यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू महाराज पुढे म्हणाले, ऋतुराज पाटील यांचे काम मी पाच वर्षे जवळून पाहिले आहे. जनहिताच्या अनेक योजना त्यांनी मतदारसंघात यशस्वीपणे राबवल्या.मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना खासदार म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करु. 
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल घाटगे म्हणाले, खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची संस्कृती असून विधायक काम करणा-यांना आमदार ऋतुराज पाटील यांना पाठबळ देऊया. 
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत म्हणाले, कणेरीवाडी पाणी योजना रद्द करण्याचे पत्र महाडिकांनी दिले होते. मात्र त्यावर ते काहीच बोलत नाहीत. 
शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले, सुशिक्षित व सर्वांना सोबत घेऊन जाणा-या आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा निवडून देऊया.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे म्हणाले माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा महाडिकांनी फारच मनावर घेतली आहे. सगळी पदे आपल्याच घरात पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे. मुलाला आमदार करण्यासाठी पाहुण्यालाही कट्यावर बसवणाऱ्यांपासून सावध रहा.
आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपा वायदंडे, सरपंच चंद्रकांत डवरे आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक बबन शिंदे डॉ. विशाल पाटील प्रणोती भाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. अर्जुन इंगळे, के डी पाटील, उत्तम आंबवडे, निशीकांत पाटील, टी. के. पाटील, संभाजीराव पाटील, दयानंद शिंदे, डी. डी. पाटील, गणपती कागले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चौकट :*जनसेवेसाठी तत्पर ऋतुराजना साथ द्या – आ.सतेज पाटील*
ऋतुराज पाटील यांची विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली आहे. क्रीडांगण विकसित करण्यासाठी गायरान मधील जमीन मंजूर करून घेण्याचा निर्णय आ.ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्यातूनच झाला. सत्ता नसताना जिद्द, कष्ट आणि सचोटीने त्यांनी मोठा निधी आणला आहे. जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या ऋतुराज पाटील यांना साथ द्या असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes