सत्यजित कदम, कृष्णराज महाडिक करणार राजेश क्षीरसागर यांचा प्रचार
schedule27 Oct 24 person by visibility 55 category
कोल्हापूर ; प्रशांत चुयेकर
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीची इच्छुक उमेदवार सत्यजित कदम व कृष्णराज महाडिक राजेश क्षीरसागर यांचा प्रचार करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
सत्यजित कदम यांना महामंडळ व विधानपरिषद याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी यावेळी माघार घेतली. अशी माहिती क्षीरसागर यांनी दिली. कदम यांनी भाजपकडून विधानसभेसाठी जोरात तयारी केली होती तिकीट न दिल्यास बंडखोर करणार असल्याचा सूर कार्यकर्त्यांनी मेळाव्यात व्यक्त केला होता. आता कार्यकर्त्यांना समजून सांगणार असल्याचा दावा कदम यांनी केला.
कृष्णराज महाडिक यांनी सुद्धा 2029 टारगेट असल्यामुळे सध्या माघार घेतल्याचे दुःख नाही असे सांगत राजेश क्षीरसागर यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. महाडिक यांनी सुद्धा उमेदवारी मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या. युवा वर्ग मोठा असून मित्र-मैत्रिणी भगिनी सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं
महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना मिळाली यावर खासदार धनंजय महाडिक यांनी सुद्धा जोरात प्रचार करणार असून जिल्ह्यातील सर्व मतदारसंघावर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी महायुतीचे इच्छुक उमेदवार महेश जाधव राहुल चिकोडे उपस्थित होते.